शेतकºयाने स्वत:वरच ओढले आसूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:54 AM2017-08-08T00:54:10+5:302017-08-08T00:54:16+5:30
नाशिक : कर्जमाफीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या अस्थी गोळा करून मंत्रालयावर प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली, पदयात्रेने सरकारचे लक्ष वेधले, राष्टÑध्वज स्तंभ खांद्यावर घेऊन जनजागृती करूनही राज्य सरकार शेतकºयांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवित नसल्याने बळीराजा शेतकरी संघाचे राज्य प्रवक्तेविजय जाधव यांनी आता राज्यभर कडकलक्ष्मी आंदोलन करून कर्जमाफीसाठी स्वत:वर चाबकाने आसूड ओढले आहेत.

यावेळी त्यांनी जिल्हाधिकाºयांना बळीराजा शेतकरी संघाच्या वतीने निवेदनही सादर केले. जून २०१७ पर्यंत शेतकºयांची कर्जमुक्ती करावी, सन २०११ पूर्वीची थकबाकी (गंगाजळी) कर्जाची वसुली थांबवावी, कर्जमुक्ती होणाºया शेतकºयांचे शेत वीज बिल माफ करा, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करा, बैलगाडीशर्यत त्वरित चालू करा, महिलांना सुरक्षित राहण्याची कायद्याची कडक अंमलबजावणी करा या मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत.