शेतकरी नवरा नको गं बाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:14 AM2021-03-18T04:14:53+5:302021-03-18T04:14:53+5:30
शेती व्यवसाय अनिश्चीत झाला असल्याने शेतकरी मुलांना फार मागणी नसते असे नाशिकमधील वधू वर सूचक मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. शेतकरी ...
शेती व्यवसाय अनिश्चीत झाला असल्याने शेतकरी मुलांना फार मागणी नसते असे नाशिकमधील वधू वर सूचक मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. शेतकरी कुटूंबातील मुलगी असेल तर मुलगा शेतकरी असल्यास हरकत नाही परंतु त्याच्या वाटेला येणारी एकुण जमिन आणि शेती बागायती आहे की शेतकरी अशी माहिती घेतली जाते. अन्य मुलींच्या अपेक्षाही बदलत चालल्या आहेत. कोरोना संकट काळात पगार कमी होणे किंवा राेजगार कमी होणे याचा विचार करून आता मुलाची एकंदर सांपत्तीक स्थिती देखील विचारात घेतली जाते. शासकीय सेवेत मुलगा असेल तर प्राधान्य पण खासगी ठिकाणी नोकरी असेल तर त्याचे पॅकेज देखील बघितले जाते. त्यातही मुलाच्या आई वडीलांची जबाबदारी नको असल्याने मुंबई- पुण्यात नोकरी असलेल्यांना देखील प्राधान्य दिले जाते.
कोट...
कोरोना काळातील रोजगाराचे संकट लक्षात घेता सध्या मुलांच्या सांपत्तीक स्थितीला महत्व आले आहे. म्हणजे मुलाची नोकरी संकटात आलीच तर पर्यायी व्यवस्था काय हे देखील बघितले जाते. म्हणजेच आर्थिक स्थैर्याला महत्व आले आहे. शेतकरी मुलांना मुलीच मिळत नाही इतके टोकाचे अनुभव मात्र नाही.
- नरेंद्र धारणे, ओम तदेव विवाह संस्था
कोट..
शेतकरी घरातील मुली शिकलेल्या असल्याने त्या जोडीदाराविषयी सजग आहेत. शेती असेल तरी सर्व बाबींचा विचार केला जातो. त्याची माहिती घेतली जाते. वराकडील कुटूंबाने शेती वाडीची जी माहिती दिली.
- संजय लोळगे, अनुपम शादी डॉट कॉम
कोट...
शेतकरी मुलांना अपेक्षीत स्थळे मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या मुली देखील शेती करणाऱ्यांना प्राधान्य दिले जात नाही. नेाकरदार मुले असले तरी क्लास वन- क्लास टु शासकीय अधिकारी असलेल्या मुलांना प्राधान्य देतात. मुलांना आई वडील असेल तर मुले मुंबई पुण्यात असावीत अशी ही अपेक्षा असते.
- हेमंत पगार, मराठा शुभ लग्न डॉट कॉम
इन्फो...
सर्वाधिक मागणी नोकरदारांना
शेतीच्या तुलनेत स्थायी नेाकरी हा मुलींच्या दृष्टीने अधिक सुरक्षीतेचा भाग असल्याने नोकरदार मुलांना प्राधान्य असते. डॉक्टर, वकील किंवा तत्सम मुलांपेक्षा शासकीय नोकरी करणाऱ्यांना प्राधान्य असते.
नोकरी करतानाही आयटी क्षेत्रातील असेल तर अधिक चांगले. मुलगी आयटी क्षेत्रातील असेल मुलगाही त्याच क्षेत्रातील असावा ही प्रमुख अट असते.
नोकरी जर अस्थायी असेल किंवा फार खात्रीशीर नसेल तर नोकरदार मुलाची सांपत्तीक स्थिती देखील बघितली जाते.
इन्फोे...
या अटी मान्य असेल तर बोला..
मुला मुलींचा कल बदलत चालला आहे. मुलींकडून आर्थिक दृष्ट्या स्थिरता हा महत्वाचा मुद्दा असून त्यामुळेच शेती करणाऱ्यांना दुय्यम स्थान मिळते. मुलीचे वडील शेतकरी असेल तरी ते आप्तेष्टांपैकी शेतकरी मुलाला प्राधान्य देत नाही. शेती बागायती असेल तर बेाला असेही सांगितले जाते. नोकरदार मुलगा असेल तर त्याचे पॅकेज पन्नास ते साठ हजार हवेत. नेाकरीसाठी वेळेची मर्यादा हवी अशी अपेक्षा असते. मुलांवर अतिरीक्त जबाबदाऱ्या नको, स्वत:च्या मालकीचे घर हवेत अशाही अपेक्षा आहेत.