लांडग्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 08:52 PM2020-11-21T20:52:55+5:302020-11-22T01:46:03+5:30
विंचूर : शेतात मिरच्या तोडत असतांना अचानक लांडग्याने हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथे घडली. नथू खारतोडे या शेतकऱ्याच्या हात व पायाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देलांडग्यांकडून नेहमीच शेतकर्यावर किंवा त्यांच्या शेळ्यां-मेंड्यांवर असे हल्ले वारंवार
विंचूर : शेतात मिरच्या तोडत असतांना अचानक लांडग्याने हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथे घडली. नथू खारतोडे या शेतकऱ्याच्या हात व पायाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुभाषनगर येथील बर्याच शेतकर्यांची शेती ही वनविभागाच्या बाजूला असून येथील बर्याच लोकांचा मेंढी,शेळी पालनाचा व्यावसाय असून लांडग्यांकडून नेहमीच शेतकर्यावर किंवा त्यांच्या शेळ्यां-मेंड्यांवर असे हल्ले वारंवार होत असतात. त्यामुळे वनविभागाने अशा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी होत आहे.