पारदेवी येथील शेतकऱ्याने केली कर्जाला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:07 PM2020-02-22T18:07:56+5:302020-02-22T18:13:02+5:30
इगतपुरी : तालुक्यातील पारदेवी येथील शेतकरी पुंडलिक पुंजा ढोन्नर (३५) यांनी कर्जाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) घडली. त्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकापासुन काही अंतरावर रेल्वेखाली स्वत:ला झोकुन देत आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली.

इगतपुरी तालुक्यात पारदेवी,त्रिंगलवाडी येथे शेती व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे पुंडलिक पुंजा ढोन्नर यांनी शेतीसाठी आयबीडीआय बँकेकडुन सुमारे अडीच लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. त्यात शेतीमध्ये वालशेंगा, मिरच्यासह इतर पिके लावली होती.
शेतीतील माल विकण्यासाठी ते दररोज कल्याण येथील भाजी बाजारात माल घेवुन जात असत. मात्र शेत मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणुन कर्ज कसे फेडायचे अशा विचाराने त्रस्त होवुन आत्महत्ये सारखा टोकाचा मार्ग त्यांनी पत्कारला.
पुंडलिक यांनी आत्महत्येपुर्वी आपल्या मोबाईल कॅमेरात स्वत:ची समस्या व संभाषणाचा व्हीडीओ तयार केला आहे. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकाजवळच्या रेल्वे लाईनवर स्वत:ला रेल्वेखाली झोकुन देत त्यांनी आत्महत्या केली.
पुंडलिक यांच्या आत्महत्येची खबर पारदेवी गावात शेककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी मथुरा, ललीता, रीना दोन मुली, मुलगा धनंजय असा परिवार आहे.
प्रतिकीया ...
शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. शेतकºयांच्या पदरी काहीच पडत नसल्यामुळे शेतकरी जीवन संपवत आहे. शेतकºयांनी आपले जीवन संपवण्यापेक्षा सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे.
- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी