कांदा टिकविण्यासाठी शेतकऱ्याने लढविली अनोखी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:39+5:302021-05-22T04:14:39+5:30

नांदगाव : कांदा टिकविण्यासाठी कांद्याच्या चाळीत प्लास्टिक पाईप फिरवून त्यातून हवा खेळविण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरविल्याने कांदा अधिक काळ टिकविण्यात ...

The farmer struggled to survive onions | कांदा टिकविण्यासाठी शेतकऱ्याने लढविली अनोखी शक्कल

कांदा टिकविण्यासाठी शेतकऱ्याने लढविली अनोखी शक्कल

Next

नांदगाव

: कांदा टिकविण्यासाठी कांद्याच्या चाळीत प्लास्टिक पाईप फिरवून त्यातून हवा खेळविण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरविल्याने कांदा अधिक काळ टिकविण्यात यश मिळाले असल्याचा दावा गंगाधरी येथील शेतकरी सुभाष जाधव यांनी केला आहे.

सध्या कांद्याचे दर कमी असतांना केवळ कांदा खराब होऊ नये म्हणून नाईलाजाने तो मार्केटमध्ये विक्रीला नेला आणि कमी भावामुळे ट्रॅक्टरचे भाडे सुध्दा परवडले नाही. म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या घटना घडत असतात. उंच रचलेल्या कांद्याच्या ढिगात, एकमेकांच्या वजनाखाली दबलेला कांदा गरम होऊन खराब होतो. हा अनुभव आहे. त्यासाठी कांदा चाळीचा पर्याय असतो. परंतु त्यालाही मर्यादा असल्याचे सिद्ध झाले आहे.

साठवलेल्या कांद्यात हवा खेळवली तर कांदा खराब होणार नाही. परंतु ते प्रत्यक्षात कसे उतरवायचे यावर मार्ग सापडत नव्हता. एकदा रस्त्याने जातांना त्यांचे लक्ष काम करत असलेल्या लोहाराकडे गेले. भट्टी पेटती ठेवण्यासाठी हवा मारण्याचा ब्लोअर (भाता) बघून जाधव यांना कांद्यात विजेवर चालणाऱ्या ब्लोअरच्या सहायाने हवा खेळती ठेवली तर उपयोग होईल, असे वाटले.

कांदा चाळीत हवा बाजूने व खालून खेळती असते. मधल्या भागात तसे होत नाही. म्हणून त्यांनी एक अश्वशक्तीचा ब्लोअर आणला. इरले (कांदा साठवण्यासाठी असलेली जाळी)च्यामध्ये अडीच इंचाचे प्लास्टिक पाईपाचे जाळे पसरवले आणि दिवसाआड काही वेळ ब्लोअरची हवा सोडण्यास सुरवात केली.

---------------------------

शेतकऱ्यांना फायदाच

कांद्याच्या भावाची तेजी पकडता येईल इतका काळ कांदा खराब न होता साठवता आला तर आर्थिक फायदा होईल. याची गणिते शेतकरी मांडत असतात. परंतु साठवलेला कांदा खराब होण्याची समस्या त्यांच्या समोर असते. जाधव यांच्या अनुभवाचा इतराना फायदा व्हावा. शासकीय कांदा चाळीचा फायदा शेतकरी वर्गास निश्चितच झाला आहे. ब्लोअर प्रणाली यशस्वी झाली तर कांदा खराब होण्याचे प्रमाण अजून कमी होऊन अधिक काळ तो साठवता येऊ शकेल. (२१ नांदगाव १)

-----------------

२१ इरले म्हणजे सुमारे नऊ ट्रॅक्टर कांदा सध्या आहे. ब्लोअरची हवा इरल्यातून खेळविली जात आहे. यामुळे कांदा अधिक काळ टिकेल. योग्य भाव वाटला की मार्केटला पाठवू. कांदा दीर्घकाळ टिकण्यासाठी त्याला कोरडे हवामान व खेळती हवा आवश्यक असते.

-सुभाष जाधव, नांदगाव

===Photopath===

210521\21nsk_3_21052021_13.jpg

===Caption===

२१ नांदगाव १

Web Title: The farmer struggled to survive onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.