जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:46 AM2018-10-18T00:46:42+5:302018-10-18T00:47:08+5:30

तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे.

 The farmer suffering from Pollution of Jowke Wani Company | जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त

जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त

Next

दिंडोरी : तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे. तक्र ार करूनही कारवाई होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. या विरोधात शेतकºयांनी आंदोलन केल्यास त्यास सदर कंपनी मालक व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी दिला आहे.  शॅम्पियन प्रकल्पात दिंडोरी, निफाड, नाशिक व चांदवड तालुक्यातील सुमारे ४५०० द्राक्ष उत्पादक शेतकरी सभासद झाले १ कोटी ४ लाख रु पयांचे शेअर्स जमा करण्यात आले व एमएससी बँकेकडून शासनाची काही रक्कम असा पाच कोटींचा शॅम्पियन प्रकल्प उभा करण्यात आला. परंतु काही तांत्रिक बाबी व विक्र ीअभावी प्रकल्प बंद पडल्याने एमएससी बँकेने प्रकल्पाला दिलेले कर्ज थकले. त्यामुळे प्रकल्प विकण्यात आला.  सध्याच्या जमीनमालकाने खरेदीस अनेक अडचणी येत असतानाही अधिकाºयांना हाताशी धरून प्रकल्प केवळ पाच कोटी ११ लाखांनी विकत घेतला. त्यामध्ये स्थानिक शेतकºयांनी मोफत दिलेली करोडो रु पयांची जमीन, ४५०० सभासदांच्या शेअर्सची रक्कम याचा कुठलाही विचार केला नाही. केवळ वरिष्ठ अधिकाºयांना हाताशी धरून शेतकºयांवर अन्याय केला. या प्रकल्पात सध्या द्राक्षापासून वाइननिर्मितीचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून चालू आहे. प्रकल्पामुळे आपले द्राक्षांची विक्र ी होईल व आपल्या द्राक्षाला योग्य मोबदला मिळेल अशीही शेतकºयांना अपेक्षा होती.  परंतु आपल्या मनमानीपणाने बेभावात द्राक्षमाल खरेदी करायचा व संबंधित शेतकºयांवर अन्याय करायचे काम मालकाने सुरू केले आहे. प्रकल्पातून निघणाºया खराब पाण्यामुळे परिसरातील जमीनमालकांंना प्रदूषणाचा त्रास होत आहे.  परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी कंपनीकडे आणि पोलीस ठाण्यातही अर्ज दिलेले आहे. परंतु कंपनी फक्त दोन चार दिवत तात्पुरता बंदोबस्त करीत वेळ ढकलत आहे. जऊळके वणी येथे असलेला दुर्गंधीयुक्त वायनरी  प्रकल्प तेथून हलवला नाही, तर परिसरातील शेतकरी कुठलाही टोकाचा मार्ग अवलंबतील व होणाºया परिणामांची जबाबदारी कंपनी मालक, पोलीस ठाणे,अधिकारी यांच्यावर राहील, लवकरच लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री, प्रदूषण विभाग यांच्याकडे तक्र ार केली जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी सांगितले.
२४ तास या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते. डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेजारील वस्तीवरील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना डेंग्यूसारखे रोग होत आहेत. जनावरांच्या व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामपंचायतीकडे तक्र ार करु नही सदर मालक थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. परिसरातील नागरिक वेळोवेळी कंपनीकडे तक्र ार करत आहेत. परंतु कंपनी दोन-चार दिवसांत बंदोबस्त करू असे सांगत वेळ मारून नेत आहे.

Web Title:  The farmer suffering from Pollution of Jowke Wani Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.