आखतवाडे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 06:18 PM2019-04-29T18:18:57+5:302019-04-29T18:19:15+5:30

आखतवाडे, ता.बागलाण येथील दादाजी नंदा ह्याळीज (४३) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उंभरे, ता. साक्र ी जि. धुळे येथे घडली. धुळे येथील रु ग्णालयात उपचारादरम्यान पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

Farmer suicide in Astrakhda | आखतवाडे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

आखतवाडे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Next

जायखेडा : आखतवाडे, ता.बागलाण येथील दादाजी नंदा ह्याळीज (४३) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उंभरे, ता. साक्र ी जि. धुळे येथे घडली. धुळे येथील रु ग्णालयात उपचारादरम्यान पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
लोकसभेच्या मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. आखतवाडे येथे दादाजी ह्याळीज यांची वडिलोपार्जित दीड एकर जमीन होती. सततची नापिकी व घटत चाललेले उत्पन्न यामुळे हाती काही लागत नसल्याने कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपली शेती विकावी लागली. वाट्याला आलेली दीड एकर जमीन विकूनही देणेकऱ्यांची देणी फिटू न शकल्याने ते विवंचनेत होते. अखेर त्यांनी मूळगाव सोडून आपल्या कुटुबीयांसह साक्र ी तालुक्यातील उंभरे येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्य केले होते. मजुरीवर उदरनिर्वाह होत नसल्याने व देणेकरांची देणी वाढतच गेल्याने त्यांनी शनिवारी (ता.२७) विषारी औषध प्राशन केले. त्यांना स्थानिकांनी तत्काळ साक्र ी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते.
वैद्यकीय अधिकाºयांनी शर्थीचे प्रयत्न करूनही यश आले नाही. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. साक्र ी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आखतवाडे येथे मूळगावी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Farmer suicide in Astrakhda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.