कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:56 AM2019-06-12T01:56:38+5:302019-06-12T01:56:54+5:30
सततची नापिकी, दुष्काळ, पाणीटंचाई व कर्जबाजारीपणा यामुळे आलेल्या नैराश्यातून टिंगरी येथील भटू निंबा पवार (३९) या तरुण शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
Next
ठळक मुद्देमालेगाव तालुक्यातील घटना
मालेगाव : सततची नापिकी, दुष्काळ, पाणीटंचाई व कर्जबाजारीपणा यामुळे आलेल्या नैराश्यातून टिंगरी येथील भटू निंबा पवार (३९) या तरुण शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
भटू पवार यांना शेती उत्पादनात प्रचंड घट झाली. दुष्काळामुळे उत्पन्न आले नाही. पवार यांच्या नावावर उसनवार घेतलेले व खासगी बँकेचे सुमारे सात ते आठ लाख रुपये कर्ज आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून त्यांनी सोमवारी रात्री शेतातील घरात विष प्राशन करून जीवन यात्रा संपविली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन लहान भाऊ असा परिवार आहे.