शेतकरी आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:14 AM2020-12-31T04:14:55+5:302020-12-31T04:14:55+5:30

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मालमत्ता सर्वेक्षण मालमत्तेचे सीमांकन निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील १,४२९ गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच मालमत्ता सर्वेक्षण करण्यात आले, असे सर्वेक्षण ...

Farmer suicides decreased | शेतकरी आत्महत्या घटल्या

शेतकरी आत्महत्या घटल्या

Next

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मालमत्ता सर्वेक्षण

मालमत्तेचे सीमांकन निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील १,४२९ गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच मालमत्ता सर्वेक्षण करण्यात आले, असे सर्वेक्षण करताना यंदा ड्रोनचा वापर करण्यात आला. यापूर्वी ब्रिटिशपूर्व काळात सन १९३० साली मालमत्तांचे सर्वेक्षण झाले होते. शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प सुरू केला असून, त्यानुसार सर्वच गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे.

साडेतीन लाख दाखले वितरित

जिल्ह्याने ऑनलाइन अर्ज वितरणप्रणाली सुरू केल्याने, लाॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना घरबसल्या विविध प्रकारचे दाखले मिळू शकले. दाखल्यांसाठी दिलेल्या ऑनलाइन सुविधेंतर्गत एप्रिलपासून प्राप्त झालेल्या ३ लाख ८४ हजार ५६७ अर्जांपैकी ३ लाख ५८ हजार ६०१ दाखल्यांची प्रकरणे निकाली काढली आहे. २५ हजार ९६६ दाखल्यांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.

अतिवृष्टीची १०९ केाटींची मदत

जिल्ह्याला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्ष, कांदा, मका, सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ९१७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात १०९ कोटींची मदत थेट जमा झाली.

पावसाचा तडाखा

जिल्ह्यात यंदा जून व जुलै महिन्यात पावसाने चिंता वाढविली. राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असताना, नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाची केवळ रिमझिम सुरू होती. ऑक्टोबरमध्ये मात्र जोरदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. शेतात पाणी साचल्याने उभी पिके आडवी झाली. काही ठिकाणी पिके सडली. जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा बसला. मका, कांदा, ऊस, सोयाबीन ही पिके आडवी झाली.

Web Title: Farmer suicides decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.