ममदापूरला शेतकर्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:07 AM2018-03-06T02:07:08+5:302018-03-06T02:07:08+5:30
यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापूर येथे तरुण शेतकºयाने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत
नाशिक : यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापूर येथे तरुण शेतकºयाने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. साईनाथ भागिनाथ शिंदे (२९) असे या शेतकºयाचे नाव असून, रविवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरातच विषारी औषध सेवन केले. शिंदे याच्या नावावर ममदापूर येथे गट नंबर ८०७ मध्ये २.६३ हेक्टर शेतजमीन आहे. त्याच्या नावे कर्ज आहे काय याचा शोध घेतला जात आहे. नाशिक जिल्ह्णात गेल्या वर्षाप्रमाणेच दरमहा सात ते आठ शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, गेल्या दोन महिन्यांत तेरा शेतकºयांनी आत्महत्या केली, तर मार्च महिन्यात पहिली आत्महत्या झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्णात १०५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. राज्यात शेतकºयांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण पाहता गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमाफी योजना जाहीर करून दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले तरीदेखील आत्महत्येचे प्रमाण कायम राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
समुपदेशन, हेल्पलाइन कुचकामी
जिल्ह्णात शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता हे प्रमाण कमी करण्यासाठी कर्जबाजारी शेतकºयांचे समुपदेशन करण्याबरोबरच त्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याची जिल्हाधिकाºयांची घोषणा हवेत विरली आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाºयांनी या संदर्भात घोषणा करून आपण स्वत:च कर्जबाजारी शेतकºयांचे समुपदेशन करणार असल्याचे घोषित केले होते. प्रत्यक्षात यापैकी एकही गोष्ट झालेली नाही किंबहुना जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भात तालुकापातळीवर तहसीलदारांना पत्र पाठवून शेतकºयांचे मेळावे व बैठका घेण्याच्या सूचना केल्या, परंतु एकाही तालुक्यात अशाप्रकारे बैठक वा समुपदेशन झालेले नाही.