मुंजवाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: June 19, 2017 12:37 AM2017-06-19T00:37:58+5:302017-06-19T00:38:10+5:30

मुंजवाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer suicides in Munjwad | मुंजवाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

मुंजवाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी नुकतीच सरसकट कर्जमाफी जाहीर करताना जाचक अटी लागू केल्यामुळे आपल्यावरील कर्ज माफ होणार नाही या नैराश्यातून मुंजवाड (ता. चांदवड) येथील शेतकरी नितीन वामनराव सूर्यवंशी (४१) यांनी कीटकनाश सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली. सटाणा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूर्यवंशी हे येथील महाविद्यालयातील अर्धवेळ कर्मचारी होते.
मुंजवाड येथील शेतकरी नितीन सूर्यवंशी आई, पत्नी, मुलगा-मुलगी परिवारासह आजमीर सौंदाणे रस्त्यावरील लक्ष्मण महाराज मंदिराजवळील शेतात राहतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले, तर कधी शेतमालाला भाव नसल्यामुळे सहा लाख रु पयांचा कर्जाचा डोंगर सूर्यवंशी यांच्या डोक्यावर होता. तसेच मुलीच्या अपघातात हात उसनवारी झाली होती. महाविद्यालयात अर्धवेळ नोकरी करून जे दोन-अडीच हजार रुपये पदरात पडत होते तेही प्रवासात खर्च होत होते.
दरम्यानच्या काळात शेतकरी क्र ांती मोर्चाच्या निर्णयामुळे सूर्यवंशींना थोडाफार दिलासा मिळत होता. मात्र शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली, पण जाचक अटी लागू केल्यामुळे सूर्यवंशी यांना नैराश्य आले. या नैराश्यातून त्यांनाी शनिवारी राहत्याघरी कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘सहा लाख रु पये कर्ज फेडण्याच्या विवंचनेत आपण या जगाचा निरोप घेत असल्याचा मजकूर यात आहे. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी घटनेबाबत अहवाल मागवून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख करीत आहेत.

Web Title: Farmer suicides in Munjwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.