नांदगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:04 AM2018-08-12T02:04:26+5:302018-08-12T02:04:45+5:30
निफाड तालुक्यातील उगाव येथे शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी नांदगावी येथे मच्छिंद्र बोरसे या शेतकºयानेही आपला जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लागोपाठच्या या घटनेने जिल्ह्यात कर्जबाजारी-पणाला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ५७ झाली आहे.
नाशिक : निफाड तालुक्यातील उगाव येथे शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी नांदगावी येथे मच्छिंद्र बोरसे या शेतकºयानेही आपला जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लागोपाठच्या या घटनेने जिल्ह्यात कर्जबाजारी-पणाला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ५७ झाली आहे.
साकोरे येथे राहणारे मच्छिंद्र साजन बोरसे (४१) यांनी दुपारी नांदगाव रेल्वेस्थानकापासून जवळच रेल्वेखाली उडी घेतली. अवघ्या काही क्षणातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील शिवडी शिवारात उगावचे शेतकरी रामदास पांडुरंग बिरार या शेतकºयाने रेल्वेखाली आत्महत्या केली. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असून, दर महिन्याला सरासरी ७ शेतकरी कर्जबाजारी-पणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. सध्या पेरणीचा हंगाम असून, एकीकडे शेतकरी शेतकामात व्यस्त असताना दुसरीकडे शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे प्रशासन बुचकळ्यात पडले आहे.