आडगाव चोथवा येथे शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 09:25 PM2020-11-05T21:25:30+5:302020-11-06T01:58:12+5:30

अंदरसुल : कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका रब्बी हंगाम शेतकरी प्रशिक्षण वर्ग आडगाव चोथवा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोदर खोकले हे होते.

Farmer training at Adgaon Chothwa | आडगाव चोथवा येथे शेतकरी प्रशिक्षण

आडगाव चोथवा येथे शेतकरी प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देकापूस व गहू पिकावर मार्गदर्शन केले.

अंदरसुल : कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका रब्बी हंगाम शेतकरी प्रशिक्षण वर्ग आडगाव चोथवा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोदर खोकले हे होते.

चर्चासत्रात विविध पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करणे या विषयावर तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शेतकरीवर्गाने माती परीक्षण करून घेण्याचे आवाहन केले. एनएचडीएफचे शास्त्रज्ञ डॉ. आमरे यांनी कांदा पिकाचे संपुर्ण व्यवस्थापन याविषयी माहिती देत, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे निरसन केले. महिको कंपनी प्रतिनिधी नवनाथ भोंडवे यांनी, कापूस व गहू पिकावर मार्गदर्शन केले. सुक्ष्म सिंचन संच देखभाल व दुरुस्ती या विषयावरही यावेळी चर्चा झाली.
संयोजन कृषी सहायक सोनाली कदम यांनी तर सुत्रसंचलन कृषी पर्यवेक्षक मधुकर वपे यांनी केले. कार्यक्रमास कृषी सहायक अरविंद आढाव, सागर माळोदे, अनुपमा पाटील, डॉ. नारायण खोकले, नांदेसर ग्राम पंचायतीचे सरपंच सुभाष वाघ, नवनाथ खोकले, रविंद्र आदमणे, राजू आदमणे, भाऊसाहेब खोकले, महेश खोकले, जालिंदर खोकले, सुभाष खोकले, नागेश घोडेराव, रामदास आदमणे, विजय वाघ, मुनीर शेख आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmer training at Adgaon Chothwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.