वडगाव पंगुला कृषी संजीवनी मोहिमेत शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:22+5:302021-06-30T04:10:22+5:30
---------------------- मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन चांदवड : येथील पुरातन गड चंद्रेश्वर गड येथे समाधी मंदिर, चंद्रेश्वरी ...
----------------------
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन
चांदवड : येथील पुरातन गड चंद्रेश्वर गड येथे समाधी मंदिर, चंद्रेश्वरी माता मंदिर, जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा नुकताच व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. मंदिराच्या परिसरात स्वामी दयानंद महाराज (प्रथम चंद्रेश्वरबाबा), महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदपुरी महाराज (द्वितीय चंद्रेश्वरबाबा) चंद्रेश्वरी माता मंदिरांचा जीर्णोद्धार होणार असून, भाविकांनी या मंदिराच्या बांधकामासाठी मदत करावी, असे आवाहन स्वामी जयदेवपुरी महाराज, चंद्रेश्वर भक्त मंडळाने केले आहे.
---------------------------------------------------
दहावी निकालापूर्वीच प्रवेश प्रक्रिया केंद्र सुरू
चांदवड - येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचालित श्री. एच.एच.जे.बी. पॉलिटेक्निकला केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश सुविधा केंद्र (फॅसीलिस्टी सेंटर ) म्हणून डीटीई, मुंबई यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे.
दहावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतन विभागाने सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयांची ऑनलाइन बैठक घेतली व प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीत दहावीच्या निकालापूर्वीच पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले. सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाबाबतची अधिसूचना याच आठवड्यात जाहीर करणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत वेळोवेळी प्रवेश सुविधा केंद्राशी संपर्क साधावा व त्यांचा अर्ज ऑनलाइन भरून घ्यावा. अधिक माहितीसाठी समन्वयक एच.आर. मेतकर व ए. एस. अजमेरे यांना संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. वानखेडे यांनी केले आहे. (वा.प्र.)