शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:46 PM2020-05-11T21:46:37+5:302020-05-11T23:42:48+5:30

वटार : कधी अस्मानी तर सुलतानी संकटाला तोंड देणाºया शेतकºयाला चालू वर्षी संपूर्ण उन्हाळ्यात कवडीमोल दराने आपला भाजीपाला विकावा लागला. हजारो रुपये खर्चून तयार केलेली शिमला मिरची तर शेडनेटमध्येच सडत आहे.

 The farmer turned the rotor on the cabbage | शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर

शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर

Next

वटार : कधी अस्मानी तर सुलतानी संकटाला तोंड देणाºया शेतकºयाला चालू वर्षी संपूर्ण उन्हाळ्यात कवडीमोल दराने आपला भाजीपाला विकावा लागला. हजारो रुपये खर्चून तयार केलेली शिमला मिरची तर शेडनेटमध्येच सडत आहे, टोमॅटो, मिरची, कोबी, कोथिंबीर या सर्वच भाजीपाला पिकांना एक ते तीन रु पये प्रतिकिलो दर मिळत असून, त्यात उत्पादन खर्च तर सोडाच; पण मालाचा वाहतूक खर्चदेखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालावरच रोटर फिरविणे सुरू केले आहे.
टोमॅटो, मिरची, कोबी, कोथिंबीर या भाजीपाला पिकांची गेल्या चार ते पाच महिन्यापासून दरात मोठी घसरण झाली असून, उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या ४० ते ४५ दिवसांपासून संचारबादीमुळे सर्व हॉटेल बंद, सर्व शहरे बंद असल्यामुळे कोबी फुकटही कोणी घेत नाही, आत्ता तर चक्क भाजीपाला बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडेसुद्धा खिशातून भरण्याची वेळ उत्पादक शेतकºयांवर आली असून, काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे. येथील संतोष बागुल या शेतकºयाने हजारो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या कोबीच्या पिकावर रोटर फिरविले आहे. दररोजच्या हवामान बदल त्यात महागडी औषधांची फवारणी करून वैतागलेला शेतकरी वातावरण बदलामुळे कोबी पिकावर करपा, आळी, पाकोळी आदी रोगांचा प्रादुर्भाव व त्यात लॉकडाउनमुळे मार्केट बंदमुळे रोटर फिरवत आहे.

Web Title:  The farmer turned the rotor on the cabbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक