ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 11:54 PM2022-01-08T23:54:25+5:302022-01-08T23:54:46+5:30
देवगाव : गेल्या सप्ताहापासून देवगाव परिसरात थंडीचा जोर वाढ असून वाढ थंडीमुळे पोषण अवस्थेत असेलेल्या द्राक्ष बागावर परिणाम होत आहे. कांदा, गहू पालेभाजा या रब्बीच्या पिकांना थंडीचा फायदा होत असला तरी सलग दोन-तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू पालेभाजा आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकरीही धास्तावले आहे.

थंडीमुळे तयार झालेल्या द्राक्षबागेतील मण्याना तडे जात आहेत. तयार नसलेल्या द्राक्षेबागेवर भुरीचे प्रमाण वाढत आहे, रात्री थंडी तर दिवसा ऊन या ऊन-सावलीच्या खेळात सनबर्निंगचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे थंडीच्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
गत दोन वर्षांपासून शेतमालाचे भाव कमी-जास्त होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल होता. मात्र शेतमालाचे बाजार भाव आणि कांद्याने रडवल्याने शेतकरी अडचणीत सापडला असताना केवळ द्राक्ष उत्पादनावर आशा आहे.
द्राक्ष पिकाला यंदा सुरुवातीला अनुकूल वातावरण मिळाले. पीक बहरून आल्याने बाजारभाव चांगला मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काही दिवसापासून वाढत्या थंडीमुळे द्राक्ष पिकांवरील समस्या वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यात सलग दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे इतर रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतीत आहे.
शेतीसह मुकी जनावरे यांनाही आजार होण्याची शक्यता आहे, तर रस्त्यावर पाल करून राहत असलेली स्थलांतरीत कुटुंबे थंडीने कुडकुडत आहेत. सकाळी उठून शेतीकामाला सुरुवात करणारे मजूर, शेतकरी थंडीमुळे उशिरा कामाला सुरुवात करतात. एकदरीतच वाढत्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात थंडीमुळे द्राक्ष बागांवर परिणाम होत आहे. तयार झालेल्या मण्यांना तडे जात आहे. तर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने इतर पिकांचे नुकसान होणार असून पोषण अवस्थेत असलेल्या द्राक्षावर भुरीचा प्रादूर्भाव वाढत आहे. शिवाय द्राक्ष मण्यांची फुगवणदेखील थांबली आहे.
- नानासाहेब सोनवणे, शेतकरी.