ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 08:44 PM2021-01-01T20:44:52+5:302021-01-02T00:17:36+5:30

नांदूरशिंगोटे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे. बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत आहे. ऐन थंडीच्या दिवसांत बदलत्या हवामानामुळे दररोज वेगवेगळ्या ऋतुंचा अनुभव येत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

The farmer was frightened by the cloudy weather | ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला

Next
ठळक मुद्देसिन्नर तालुका : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

बदलत्या वातावरणाचा सरळ रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा, मका आदी पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात दररोज बदल होत असल्याने कधी पाऊस तर कधी धुके, तर दिवसभर कडक उन्हाचा चटका व रात्री कडाक्याची थंडी अशा वातावरणाचा अनुभव येत आहे. नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असल्याने परिसरात पाणीटंचाई नाही. चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नव्हते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून परिसरात वातावरणातील बदल पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला आहे. वातावरणात कमालीचा गारठा व रोगट परिस्थिती असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. शेतकऱ्यांनी महागडी कांदा रोपे विकत घेऊन बियाणे तयार केले होते. त्यानंतर, कांदा लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
अनियमित वीजपुरवठा
एकीकडे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही, तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे महागडी फवारणीचे औषधे घ्यावी लागत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. या वर्षी कांदा पिकाला चांगला भाव मिळत असल्याने, सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली आहे. ढगाळ वातावरणाचा कांदा पिकांबरोबरच अन्य शेती मालावर परिणाम होत आहे.

Web Title: The farmer was frightened by the cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.