उष्ण ,ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 05:38 PM2019-04-04T17:38:32+5:302019-04-04T17:38:48+5:30
खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी शेतात काढून ठेवलाला उन्हाळी कांदा सुरक्षितकसाठेवावा म्हणून चिंतातुर झाला आहे.
खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी शेतात काढून ठेवलाला उन्हाळी कांदा सुरक्षितकसाठेवावा म्हणून चिंतातुर झाला आहे.
कसमादे परिसरात उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरु असल्याने शेतात सर्वत्र उन्हाळी कांद्याच्या वरळी दिसून येते आहे. कसमादे परिसरात उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते.गेल्या सात-आठ वर्षापुर्वी या परिसरात डाळीबांची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यामुळे त्यावेळेस डाळिंब या पिकाकडे हमखास पैसे मिळवून देणार नगदे पिक म्हणून पाहिले जात असे.त्यावेळी उन्हाळी कांदा अल्प प्रमाणात घेतले जात होते. त्यामुळे कांद्याला भावहि चांगला मिळत होता.परंतु गेल्या पाच-सहा वर्षापुर्वी डाळिंब पिकावर तेल्या रोगाने थैमान घातल्याने डाळींबाची शेती पूर्णउध्वस्थ झाल्यानेउन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली.