प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्यांसह पीक विम्याअभावी शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:16 AM2021-08-23T04:16:31+5:302021-08-23T04:16:31+5:30
शेतकरी नेते शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या अध्यक्षतेखाली इगतपुरी तालुक्यातील विविध गावांत संपन्न ...
शेतकरी नेते शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या अध्यक्षतेखाली इगतपुरी तालुक्यातील विविध गावांत संपन्न झाली. व्हिटीसी फाटा ते साकुर फाटा समृद्धीमार्ग जोडरस्त्यासाठी जमीन संपादित करण्यासंदर्भात जमिनीचा १२ पट मोबदला मिळावा, तसेच गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, मागीलवर्षी पडलेल्या पावसामुळे नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी साकुर येथील सभेप्रसंगी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आहुर्ली येथे पार पडलेल्या सभेत १९७२/७३ मध्ये वैतरणा धरणासाठी खूप मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली असून या धरणाचे पाणी मुंबई महापालिकेला जात आहे. मात्र येथील धरणग्रस्त व्यक्तींना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना मोठा लढा उभा उभारणार असल्याचे यावेळी घनवट यांनी आयोजित बैठकीत सांगितले.
याप्रसंगी बैठकीत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सीमा नरोडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.
सभेसाठी नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, ज्येष्ठ नेते शंकरराव पुरकर, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर ढिकले, अर्जुन बोराडे, उपाध्यक्ष तानाजी झाडे, शंकरराव ढिकले, रामनाथ ढिकले, बाळासाहेब धुमाळ, उपजिल्हाध्यक्ष तानाजी झाडे, तालुकाध्यक्ष किसन शिंदे, बाळासाहेब नाठे, उपतालुकाध्यक्ष अरुण जुंद्रे, रामदास गायकर, रामनाथ जाधव, भाऊसाहेब गायकर, आदिवासी सेनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शेंडे, काळू सोनवणे, माजी सभापती आनंदराव सहाणे, चेअरमन मधुकरराव सहाणे, सरपंच विनोद आवारी, तुकाराम सहाणे, ईश्वर सहाणे, संतू पाटील गायकर, दत्तू गायकर, रामचंद्र गायकर, दिलीप मेदडे, राजाराम गायकर, गोविंद खकाळे, रुंजा वाघ आदी शेतकरी उपस्थित होते.
कोट...
इगतपुरी तालुक्यातील विविध प्रकल्पांसाठी शासनाने हजारो हेक्टर जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्याही दिल्या नाहीत. तसेच पीक विमा कंपनीने तालुक्यातील शेतकऱ्यांना फसवले असून या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- रामदास गायकर, सचिव, शेतकरी संघटना, इगतपुरी तालुका
छायाचित्र- २२ साकूर १
इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे संघटनेच्या बैठकीस उपस्थित शेतकरी.
220821\22nsk_1_22082021_13.jpg
इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे संघटनेच्या बैठकीस उपस्थित शेतकरी.