पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 05:02 PM2017-12-08T17:02:56+5:302017-12-08T17:03:06+5:30
येवला : पाणी वापर सहकारी संस्थांना शासनाच्या करारानुसार आजपर्यंत पाणी कोटा मिळालेला नाही. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे याचा शासनाने विचार करावा.पाणी वाटप सहकारी संस्थांना करारानुसार पाणी कोठा देता येत नसेल तर शासनाने स्वत: शेतकºयांना पाणी वाटप करावे.अशी भूमिका घेत तालुक्यातील श्री साई पाणीवापर सहकारी संस्था भिंगारे (ता.येवला ) व हनुमान पाणी संस्थेच्या शेवगे यांच्या अध्यक्षांनी व संचालकांनी राजीनामे दिले आहेत.
येवला : पाणी वापर सहकारी संस्थांना शासनाच्या करारानुसार आजपर्यंत पाणी कोटा मिळालेला नाही. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे याचा शासनाने विचार करावा.पाणी वाटप सहकारी संस्थांना करारानुसार पाणी कोठा देता येत नसेल तर शासनाने स्वत: शेतकºयांना पाणी वाटप करावे.अशी भूमिका घेत तालुक्यातील श्री साई पाणीवापर सहकारी संस्था भिंगारे (ता.येवला ) व हनुमान पाणी संस्थेच्या शेवगे यांच्या अध्यक्षांनी व संचालकांनी राजीनामे दिले आहेत.राजीनाम्याचे हे सत्र सुरूच राहणार असल्याने यंदा पालखेड डाव्या कालव्याचे पाणी वाटप कसे होणार याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे.
पाणी वापर संस्थांना पाणी कोट्याच्या तुलनेत कमी पाणी दिले जाते.यामुळे लाभार्थी शेतकर्यांना पाण्याचे वितरण करणे पाणीवापर संस्थांना पाणी वाटणे अवघड होत आहे.यामुळेच श्री साई पाणी वापर सहकारी संस्था भिंगारे व शेवगे यांच्या पदाधिकार्यांनी गावपातळीवर बैठका घेवून चर्चा केली.पाणी वाटप संस्थेने करू नये आणि पदाधिकाºयांनी राजीनामे द्यावेत,असे ठराव पारित करण्यात आले.
अखेर वैतागून संस्थेच्या पदाधिकार्यांनी पालखेड डावा कालवा कार्यकारी अभियंता व बळीराज्य पाणी वापर संस्था चेअरमन संतू पाटील झांबरे,सुरेश कदम यांचेकडे राजीनामे पाठवले आहे