बैलगाडा शर्यतीसाठी शेतकऱ्यांचे घोटीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:34+5:302021-08-24T04:19:34+5:30
इगतपुरी/घोटी : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल लंगडे व खरेदी-विक्री संघाचे ...
इगतपुरी/घोटी : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल लंगडे व खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील टाके-घोटी येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हिरामण खोसकर व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनप्रसंगी आग्रही भूमिका मांडण्यात आली असून, निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. शर्यतबंदीमुळे देशी गाय, बैलांचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्यामुळे जतन, संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन, विक्री व शर्यती आयोजित करण्याची परंपरा आहे. यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, माजी सभापती रघुनाथ तोकडे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, गटनेते विठ्ठल लंगडे, भगीरथ मराडे, प्रशांत कडू, हरिश्चंद्र चव्हाण, अनिल भोपे, नंदलाल भागडे, त्र्यंबक गुंजाळ, दशरथ भागडे, हिरामण लहाणे, गोटीराम चव्हाण, जालिंदर कडू, शिवनाथ काळे, देवीदास लंगडे, देवानंद गोईकणे, पोपट लंगडे, राजू लहाने, कार्तिक कोंडाजी गतीर, गंगाराम कडू, गणेश गतीर, मच्छिंद्र तोकडे, बाजीराव गतीर, जगन गतीर, सुनील गुंजाळ, नामदेव लहाने, विजय कडू, अंकुश कडू, गुरुनाथ कडू, सुधाकर आडोळे, संजय भगत उपस्थित होते.
फोटो- २३ निवेदन १
230821\2040-img-20210823-wa0034.jpg~230821\23nsk_46_23082021_13.jpg
बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या मागणीसाठी परमेश्वर कासुळे व आमदार हिरामन खोसकर यांना निवेदन देत असतांना आंदोलक विठ्ठल लंगडे, ज्ञानेश्वर लहाने, संदीप गुळवे, काशिनाथ मेंगाळ, भास्कर गुंजाळ, रघुनाथ तोकडे, हरीश चव्हाण अनिल भोपे आदी.~फोटो- २३ निवेदन १