शेतकरी आंदोलनात उभी फूट १ मार्चच्या संपातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:21 AM2017-12-31T00:21:06+5:302017-12-31T00:22:20+5:30

नाशिक : पुणतांबे येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या शेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात उभे राहिलेल्या आंदोलनात विविध टप्प्यांवर चढउतारानंतर अखेर फूट पडली आहे.

Farmer's agitation came out of the collapse of March 1 | शेतकरी आंदोलनात उभी फूट १ मार्चच्या संपातून बाहेर

शेतकरी आंदोलनात उभी फूट १ मार्चच्या संपातून बाहेर

Next
ठळक मुद्दे सुकाणू सदस्यांचा समिती विसर्जित केल्याचा दावा सुकाणू समितीत विसर्जित करीत असल्याची घोषणा

नाशिक : पुणतांबे येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या शेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात उभे राहिलेल्या आंदोलनात विविध टप्प्यांवर चढउतारानंतर अखेर फूट पडली आहे. पुणतांब्याच्या समितीने ३ जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत संपातून माघार घेतल्यानंतरही नाशिकच्या शेतकºयांनी हा संप पुढे नेटाने चालवत सुकाणू समितीची स्थापना केली होती. परंतु, आता नाशिक-मधीलच एका गटाने १ जानेवारीला सुकाणू समितीच्या राज्यस्तरीय बैठकीचे नियोजन केले असताना दुसºया गटाने सुकाणू समितीत विसर्जित करीत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आंदोलनाचे केंद्र बनलेल्या नाशिकमधूनच शेतकरी आंदोलनात उभी फूट पडली आहे.
पंडित कॉलनीत झालेल्या बैठकीत सुकाणू समिती सदस्य हंसराज वडघुले, अमृता पवार, चंद्रकांत बनकर कैलास खांडबहाले यांनी विविध शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांची बैठक घेऊन सुकाणू समिती विसर्जित करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच औरंगाबाद येथील बैठकीत झालेल्या १ मार्चपासून संप पुकारण्याच्या निर्णयालाही या बैठकीत विरोध करण्यात आला आहे. पुणतांबे येथील शिष्टमंडळाने शासनाशी केलेली तडजोड मान्य न झाल्याने नशिक येथील संयोजन समितीने निर्णायक बैठक घेऊन शेतकºयांचे आंदोलन पुढे नेण्याचा आणि या आंदोलनाचा राज्यव्यापी करण्याचा निर्धार करीत ५ जून २०१७ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून सुकाणू समितीची स्थापना केली होती. या समितीच्या प्रयत्नातून शासनाला अंशत: क ा होईना कर्जमुक्ती देण्यास भाग पाडल्याचा दावा या समितीच्या सदस्यांनी केला आहे. परंतु, नजीकच्या काळात सुकाणू समितीचे कामकाज दिशाहीन झाल्याची कबुली देत समितीच्या सदस्यांनी मूळ संयोजन समिती, कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता काही ठराविक संधीसाधू व्यक्ती निर्णय जाहीर करीत असल्याने आंदोलनाची मूळ संयोजन समिती म्हणून राज्याची सुकाणू समिती विसर्जित करण्यात आल्याचे घोषित केले. यावेळी नाना बच्छाव, माधुरी भदाणे, चेतन शेलार, प्रकाश चव्हाण, गंगाधर निखाडे आदी उपस्थित होते.
 संप हाणून पाडण्याचा इशारा
ल्ल औरंगाबाद येथे सुकाणू समितीच्या नावाने काही मोजक्या लोकांनी १ मार्च २०१८ पासून पुन्हा शेतकरी संपाची हाक दिली आहे. या काळात शेतकºयांची द्राक्ष, कांदे, ऊस, टमाटा, भाजीपाला अशा विविध प्रकारचा शेतमाल बाजारात विक्रीसाठी येणार असल्याने संपामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असल्याने संयोजन समितीने या निर्णयाचा विरोध केला असून, संप हाणून पाडण्याचा इशाराही दिला आहे.
नाशिकच्या सुकाणू समिती पदाधिकारी यांनी जी भूमिका घेतली आहे, जे मुद्दे मांडले आहेत ते प्रश्न १ जानेवारीच्या बैठकीत मांडणार आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या सुरूच असून, संपूर्ण कर्जमुक्ती झालेली नाही. सुकाणूच्या माध्यमातून एकत्रित काम करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय सामुदायिक घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेचे सर्व नेते एकत्र राहणे आवश्यक असून, याचा विचार सुकाणू समितीतील सर्वांनी करावा व शेतकºयांचा लढा पुढे सुरू ठेवावा. दूर जाणाºया सहकाºयांनाही विश्वासात घेण्याची गरज आहे.
- राजू देसले, सुकाणू सदस्य, किसान सभा, नाशिक
सुकाणू समिती विसर्जित करण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्यासह हंसराज वडघुले, चंद्रकांत बनकर, कैलास खांडबहाले, नाना बच्छाव, माधुरी भदाणे, चेतन शेलार, प्रकाश चव्हाण आदी.बैठकीतील निर्णय नाशिकच्या संयोजन समितीने सुकाणू समितीच विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या नावाने कोणीही पत्रव्यवहार, आंदोलन केल्यास त्याचा मूळ आंदोलनाशी संबंध राहणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीची व्याप्ती वाढवून पुनर्रचना करण्यासोबतच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसोबत काम करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Web Title: Farmer's agitation came out of the collapse of March 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.