कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:42 PM2019-05-12T22:42:23+5:302019-05-12T22:42:48+5:30

सिन्नर : तालुक्यातील सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. नांदूरशिंगोटे उपबाजारात गेल्या आठवड्यापर्यंत ६ ते ७ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. ती आता ३ हजार क्विंटलपर्यंत आली आहे. आवक निम्म्यावर घसरली आहे. असे असले तरी दरात सुधारणा होण्याची सूतराम शक्यता नसल्याचेच रोजच्या लिलावावरून दिसून येत आहे.

Farmers are afraid of falling onion prices | कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी धास्तावला

कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी धास्तावला

Next

सिन्नर : तालुक्यातील सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. नांदूरशिंगोटे उपबाजारात गेल्या आठवड्यापर्यंत ६ ते ७ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. ती आता ३ हजार क्विंटलपर्यंत आली आहे. आवक निम्म्यावर घसरली आहे. असे असले तरी दरात सुधारणा होण्याची सूतराम शक्यता नसल्याचेच रोजच्या लिलावावरून दिसून येत आहे.
नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात गोणी कांद्याचे लिलाव होतात. उन्हाळ कांद्याच्या भावात समाधानकारक वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदाचाळीत मालाची साठवणूक करण्यास पसंती दिल्याचे चित्र आहे. परिणामी सिन्नरला कमाल ९२५ रुपये क्विंटलने कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून केली गेली असली तरी सरासरी मात्र अवघा ८०० रुपये क्विंटलचा दर शेतकºयांच्या हातात पडत आहे. तर नांदूरशिंगोटेत गोणीला ११५१ रुपये तर सरासरी ९०० रुपये भाव मिळाला. पांढुर्लीतही गोणी कांद्याची आवक निम्म्यावर आली आहे. सिन्नर, दोडी आणि नायगाव उपबाजारातही अशीच गत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात कांद्याने मेटाकुटीस आणले आहे. अत्यल्प दरामुळे उत्पादन खर्चही भरून न निघाल्याने शेतकºयांना कांदा विक्रीस आणताना वाहनांचे भाडे देणेही परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी कांदा उकिरड्यावर फेकून दिला. यंदा मात्र उन्हाळ कांद्याला दर मिळण्याची शेतकºयांची अपेक्षा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी मागील वर्षाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी यंदा कांदा साठवणुकीस पसंती दिली आहे. आधुनिक कांदा चाळी उभारून शेतकºयांनी त्यात माल साठविला आहे.

Web Title: Farmers are afraid of falling onion prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा