शेतकरी भयभीत : डाव्या कालव्याच्या ‘कॉरिडोर’मध्ये बिबट मादीचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 05:22 PM2019-01-10T17:22:54+5:302019-01-10T17:27:55+5:30

नाशिक : महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या , तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. ...

Farmers are frightened: leopard female communication in left canal corridor | शेतकरी भयभीत : डाव्या कालव्याच्या ‘कॉरिडोर’मध्ये बिबट मादीचा संचार

शेतकरी भयभीत : डाव्या कालव्याच्या ‘कॉरिडोर’मध्ये बिबट मादीचा संचार

Next
ठळक मुद्देगैरकृत्यातून असुरक्षिततेची जाणीव नकोवनविभागाच्या पथकाने पाहणी करून पिंजरे तैनात केले ‘कॉरिडोर’मध्ये भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव

नाशिक : महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या, तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षीदेखील जानेवारी ते फेब्रुवारीच्या कालावधीत बिबट मादीचा पिलांसह या कॉरिडोरमध्ये मुक्त संचार येथील शेतकरी रहिवाशांना आढळून आला होता. यावर्षी पुन्हा बिबट मादीने मागील पंधरवड्यापासून चांदशी-मखमलाबाद शिवारात मुक्त संचार करण्यास सुरुवात केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

शहरापासून लांब व नैसर्गिक लपण असलेला परिसर म्हणून डाव्या कालव्याची ओळख आहे. गंगापूर धरणापासून सुरू होणारा डावा तट कालवा महादेवपूर, जलालपूर, चांदशी, मखमलाबाद, मेरीमार्गे पुढे जातो. महादेवपूरपासून थेट मेरीपर्यंत या कालव्याच्या परिसरात वृक्षराजी काटेरी झुडपे गवताचे साम्राज्य असल्यामुळे बिबट्यासारख्या वन्यजिवांसाठी हा परिसर सुरक्षित नैसर्गिक अधिवास ठरतो. कारण अधूनमधून कालव्याला आवर्तनांमुळे पाणी असते व आवर्तन बंद झाल्यानंतरही काही दिवस कालव्यात पाण्याचे डबके साचून असतात त्यामुळे वन्यजिवांची या भागात सहज तहान भागते. मागील काही महिन्यांपासून कालव्याच्या या ‘कॉरिडोर’मध्ये भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव वाढला आहे. यामुळे बिबट्याच्या खाद्याचाही प्रश्न सुटला आहे. तसेच शेतकऱ्यांचे पशुधनदेखील असुरक्षित पध्दतीने या भागात असल्याचे दिसूून येते. यामुळे गंधारवाडी ते मखमलाबाद फाट्यापर्यंत बिबट्याचा संचार पंधरवड्यापासून येथील शेतकºयांना अधिक जाणवत आहे. बिबट मादीचा संचार वाढल्याने शेतक-यांमध्ये दहशत पसरली आहे. पिलांसह मादी कालव्याच्या परिसरात वावरत असून, अनेकांना तिने दर्शन दिले आहे. बिबट मादीचा आढळून आलेला वावर आणि लोकवस्ती व मळे परिसर बघता वनविभागाच्या पथकाने पाहणी करून संभाव्य मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी या परिसरात पिंजरे तैनात केले आहेत. तसेच नियमित गस्तही सुरू करून बिबट्याच्या वास्तव्याच्या खुना शोधून त्यानुसार पिंज-यांची जागा बदल करण्यात येत आहे.

गैरकृत्यातून असुरक्षिततेची जाणीव नको
बिबट मादीने अद्याप कुठल्याही प्रकारे उपद्रव माजविला नसून, नागरिकांनी संयम बाळगून खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. बिबट मादी किंवा तिच्या पिलांना असुरक्षिततेची जाणीव होईल, असे कुठलेही गैरकृत्य नागरिकांनी टाळावे. दोघांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे; कारण तसे झाल्यास मादी आक्रमक होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सावधगिरीने ही परिस्थिती वनविभागाकडून हाताळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: Farmers are frightened: leopard female communication in left canal corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.