खतांच्या कृत्रिम टंचाईने शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:51 PM2020-08-07T22:51:34+5:302020-08-08T01:06:09+5:30
निफाड तालुक्यातील सर्वत्र पेरण्या आटोपल्या असून, मका, सोयाबीनसह अनेक पिकांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी शेतकरी युरिया खताचा वापर करीत असतात; परंतु सद्य:स्थितीत बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. अनेक कृषिसेवा केंद्रांवर चकरा मारूनही शेतकऱ्यांना युरिया व इतर खते मिळत नसल्याने ते हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
सायखेडा : निफाड तालुक्यातील सर्वत्र पेरण्या आटोपल्या असून, मका, सोयाबीनसह अनेक पिकांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी शेतकरी युरिया खताचा वापर करीत असतात; परंतु सद्य:स्थितीत बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. अनेक कृषिसेवा केंद्रांवर चकरा मारूनही शेतकऱ्यांना युरिया व इतर खते मिळत नसल्याने ते हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
मागील काही दिवसातच बाजारपेठेतून युरिया अचानक गायब कसा झाला कसा, याबाबत तर्क-वितर्कलावले जात असून, भविष्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात वाढीव दराने खते विकण्याचा फंडा तर वापरला जात नाही ना, अशा प्रकारची शंका शेतकºयांच्या मनात घर करत आहे. शेतीसाठी युरिया अत्यावश्यक वस्तू असून त्यावर सरकारचे आणि कृषी विभागाचे कठोर नियंत्रण असणे आवश्यक आहे; परंतु सध्याच्या स्थितीत जवळपास सर्वच कृषी केंद्र दुकानातून युरिया हद्दपार असल्याने शासनाचे याकडे लक्ष नाही काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
अनेक दुकानदार खते साठवून ठेवतात व कृत्रिम टंचाई निर्माण करून नंतर चढ्या दराने विक्र ी करतात. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी कठोर भूमिका घेऊन अशा दुकानदारांवर कडक कारवाई केली तर खताची टंचाई निर्माण होणार नाही.
- रामा राजोळे, शेतकरी संघर्ष संघटना
सोयाबीन, मका तसेच नगदी पिके बहरली असून, वाढीच्या काळात रासायनिक खतांची गरज आहे; मात्र अनेक दिवसांपासून युरिया व इतर खते मिळत नाहीत. त्यामुळे पीक हातातून जाण्याची वेळ आली आहे. शासनाने तत्काळ खते उपलब्ध करून द्यावे.
- नवनाथ कमानकर, शेतकरी