शेतकरी भागवताहेत तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:16 PM2020-06-13T22:16:27+5:302020-06-14T01:30:45+5:30
नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत.
नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे पाच ते सहा महिन्यांपासून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम रखडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे नांदूरवैद्य येथील शेतकरी दत्तू शांताराम दिवटे व सागर शांताराम दिवटे या दोन बंधूंनी गावातील महिलांची होणारी कसरत पाहून सामाजिक जाणिवेतून आपल्या शेतीची कामे बाजूला ठेवत दररोज गावाची मोफत तहान भागवित आहेत. यामुळे त्यांचा एक वर्षाचा ग्रामपंचायतीचा कर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
नांदूरवैद्य येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीच्या नवीन विहिरीचे खोदकाम करण्यास सुरु वात केली असून, आजपर्यंत विहिरीचे काम पूर्ण न झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.
यामुळे शेतकरी दिवटे बंधंूनी उदात्त भावनेने त्यांच्या शेतातील पाइपलाइनद्वारे ग्रामस्थांना पाण्याची सोय करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी गावातील नागरिकांना पाणी देतेवेळी त्यांच्या शेतातील उभ्या पिकाला पाणी न देता व लाईटबिलाची चिंता केली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून येणे असलेला एक वर्षाचा ग्रामपंचायत कर माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
-------------------------
नांदूरवैद्य गावात पाणीपुरवठा करणाºया मुख्य विहिरीचे काम रखडल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली वणवण न पहावल्यामुळे आम्ही दोन्हीही बंधूंनी निर्णय घेत एक सामाजिक बांधिलकी या नात्याने गावासाठी शेतीची कामे बाजूला सारून ठेवत शेतीच्या पंपाद्वारे ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सोय केली.
- दत्तू व सागर दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य