हमीभाव मिळविण्यासाठी शेतकरी सरसावले

By admin | Published: June 4, 2016 10:33 PM2016-06-04T22:33:06+5:302016-06-04T23:09:07+5:30

पिंपळगाव बसवंत : कांदाप्रश्नी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची बैठक!

Farmers are ready to get the guarantee | हमीभाव मिळविण्यासाठी शेतकरी सरसावले

हमीभाव मिळविण्यासाठी शेतकरी सरसावले

Next

पिंपळगाव बसवंत : कांद्याला हमीभाव मिळावा व शासकीय अनुदान मिळावे आदि अनेक मागण्यांसाठी पिंपळगाव बसवंत येथे सोमवार, दि. ६ जून रोजी सकाळी ९.३० वा. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती गेटसमोर मुंबई महामार्ग येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर
उतरणार असल्याची माहिती पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव बनकर यांनी दिली.
कांदा उत्पादक तसेच सर्व शेतकरी बांधवांच्या भावना त्यांच्यामार्फत शासनापर्यंत पोहचवल्या जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही बनकर यांनी स्पष्ट करून तालुक्यातील गावानुसार प्रत्येकावर जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने आंदोलन मोठ्या स्वरूपाचे करण्यात येईल.
शासन याची दखल घेईल. यातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार धनंजय मुंडेही सहभागी होत असल्याचे सांगितले.
या बैठकीसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र
पगार, भास्करराव बनकर, तानाजीराव बनकर, अनिल पा. कुंदे, प्रकाश अडसरे, सिद्धार्थ वनारसे, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल बोरस्ते, हरिश्चंद्र भवर, नारायण चव्हाण, सागर कुंदे, देवरत्न कापसे,
उमाकांत गवळी, वैकुंठ चोपडे, राहुल बनकर, माधवराव ठोमसे, बाजार समितीचे उपसभापती गुरुदेव कांदे, संचालक सोहनलाल भंडारी, दीपक बोरस्ते, चिंतामण सोनवणे, शंकरलाल ठक्कर, सुरेश खोडे, साहेबराव खालकर, रामभाऊ माळोदे, निवृत्ती धनवटे, नारायणमामा पोरे, गोकुळ गिते, सचिव संजय पाटील तालुक्यातील विविध गावातील मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Farmers are ready to get the guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.