विज पुरवठ्यातील बदलामुळे शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:31 PM2019-09-09T18:31:06+5:302019-09-09T18:31:36+5:30
तरसाळी : ग्रामीण भागातील विजेच्या वेळापत्रकात विज वितरण कंपनीकडून बदल करण्यात आला असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून आठवड्यातील चार दिवस, रात्री आठ ते सकाळी सहा यावेळेस थ्री फेज वीज वीज पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.

राज्य सरकार शेती आणि शेतकरी यांच्याबाबत घेतलेले काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असून पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी जिल्ह्यामधील अनेक तालुक्यातील शेतकºयांना रात्रीचे काम करावे लागत आहे.
रात्री होणाºया थ्री फेज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरणार आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नदीकाठी तसेच शेतात मोठे गवत झाले आहे. रात्रीच्या वेळेस अशा गवतातून जाऊन कृषी पंप सुरू करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
साप, विंचू यासह हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याला रात्रीच्यावेळी शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे.
उद्योग धंदयाच्या तुलनेत शेतीसाठी कमी प्रमाणात वीज दिली जाते. दिवसाला सात ते आठ तास वीज पुरवठा उपलब्ध होत असता,े त्याच वेळी शेतकºयांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातच भरात भर म्हणजे दर महिन्याला विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकºयांना भेटी देण्याचे काम महावितरणकडून होत असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले आहे. परिणामी शेतकरी वर्ग विज वितरण कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.
वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेला हा बदल अजब स्वरूपाचा आहे. दिवसभरात शेतात काबाडकष्ट करून शेतकºयांना रात्रीच्या या बदलामुळे जागरण करावे लागत असून, यामुळे शेतकºयांची झोपही आता पारखी झाली आहे.
- कपिल सोनवणे, शेतकरी, औंदाणे.
रात्री येणारी वीज शेतकरी वर्गासाठी तोट्याची आहे. दिवस उजाडण्याच्या आधीच वीज जाते यामुळे शेतात राहणाºया महिलांना पाणी भरण्यासाठी रात्रीच जावे लागते. तर शेतकºयांना कृषी पंप बंद करण्यासाठी जावे लागत आह.े सरकार आणि वीज कंपनी शेतकºयांच्या जीवाशी खेळत आहे म्हणून विजपुरवठ्याच्या वेळेत बदल करून दिवसा ३ ते ४ तास वीजपुरवठा होईल असा बदल करावा.
- तुषार खैरनार, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना.