हंगाम कवडीमोल तरीही शेतकरी ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:32+5:302021-03-15T04:14:32+5:30

शरदचंद्र खैरनार एकलहरे : गेले आठ ते दहा महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील हंगाम कवडीमोल ठरला. अशाही परिस्थितीत ...

Farmers are still determined | हंगाम कवडीमोल तरीही शेतकरी ठाम

हंगाम कवडीमोल तरीही शेतकरी ठाम

Next

शरदचंद्र खैरनार

एकलहरे : गेले आठ ते दहा महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील हंगाम कवडीमोल ठरला. अशाही परिस्थितीत यंदाच्या हंगामासाठी शेतकरी ठामपणे शेतात राबत असून, शेती कामांना वेग आला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात सध्या गहू सोंंगणी, उन्हाळी कांद्याची निगा राखणे, सिझनमधील भाजीपाला मार्केटला नेणे या कामात शेतकरी व्यस्त झाले आहेत.

वातावरणातील बदल, कधी कडक उन्हाच्या झळा, तर कधी ढगाळ हवामान याचा सामना करत, नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी विविध शेतीकामात कुटुंबासह व्यस्त असलेले दिसतात. पीक लागवडीपासून माल मार्केटला जाईपर्यंत शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गेले आठ ते दहा महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील हंगाम कवडीमोल ठरला. अशाही परिस्थितीत ठामपणे उभे राहत यंदाचा हंगाम घेण्यासाठी शेतकरी काबाडकष्ट करीत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात सध्या गहू सोंंगणी, उन्हाळी कांद्याची निगा राखणे, सिझनमधील भाजीपाला मार्केटला नेणे या कामात शेतकरी व्यस्त आहेत. पंचक्रोशीतील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, कालवी, गंगापाडळी, एकलहरेगाव, ओढा, शिलापूर, लाखलगाव या गावांमध्ये गहू सोंगणीचा हंगाम जोरात सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये पेरलेला गहू मशिनद्वारे काढण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. गहू सोंंगणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतःचेच मशीन खरेदी करून भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात केली आहे.

गहु सोंंगणीसाठी एकरी २,२०० ते २,५०० रुपये मजुरी दिली जाते. चांगली काळी कसदार जमीन असली, तर एकरी २० ते २५ क्विंटल व साधारण जमिनीत एकरी १५ ते २० क्विंटल गहू निघतो, असे शेतकरी सांगतात. पूर्व भागात अजित १०२, त्र्यंबक या वाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. डिसेंबरमध्ये उशिरा पेरलेला गहू एप्रिलमध्ये निघेल. यंदा गव्हाचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा कमी असले, तरी उतारा चांगला असल्याने बऱ्यापैकी उत्पन्न निघेल, असा शेतकऱ्यांचा व्होरा आहे.

हिंगणवेढा, जाखोरी, कोटमगाव शिवारात उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. कांद्यावर औषध फवारणी, निंदणी ही कामे भर उन्हात शेतकरी कुटुंबासह करीत आहेत. हा कांदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात काढून चाळीत साठवून ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कांद्याच्या चाळीची दुरुस्ती व डागडुजी सुरू आहे.

----कोट----

यंदा नाशिक तालुका पूर्व भागात गव्हाचे प्रमाण कमी असले, तरी उतारा चांगला असल्याने, समाधानकारक उत्पन्न मिळेल. याउलट दिंडोरीसारख्या भागात गहू मुबलक असला, तरी उतारा कमी झालेला आढळून येतो. गहू काढण्याचे मशीन तिघांनी मिळून घेतले असल्याने, स्वतःच्या शेताबरोबरच इतरांच्या शेतात गहू काढणीसाठी मशीन दिले जाते. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळते.

वाल्मिक धात्रक - शेतकरी, हिंगणवेढे

===Photopath===

140321\14nsk_19_14032021_13.jpg

===Caption===

एकहरे येथे सुरू असलेले शेती काम

Web Title: Farmers are still determined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.