रस्त्यावरील धुळीने शेतकऱ्यांचे हाल पे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 11:24 PM2020-12-02T23:24:21+5:302020-12-03T00:36:12+5:30
पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपळगाव बसवंत परिसरातील वणी चौफुली, मुखेड फाटा आणि अंतरवेली फाटा या ठिकाणी सतत अपघात घडतात. या ठिकाणच्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे अपघाताबरोबर शेतमालाचेही नुकसान होत आहे. सततच्या उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देवी मंदिर परिसरातील वस्तीलगत भूमिगत नाल्यासाठी ५ फुटाच्या अधिक खोल नाली गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खोदून ठेवल्या आहेत. गटारीत डासांची उत्पत्ती वाढली असून, डेंग्यूसारखे साथरोग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे व नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. (०२ पिंपळगाव २)
............................................................................
द्राक्ष उत्पादक हवालदिल....
परिसरात रस्त्याचे व गटार नालीचे काम अपूर्ण असल्यामुळे धुळीचे व घाणीचे साम्राज्य वाढले आहे. परिसरातील द्राक्षबागांवर उडणाऱ्या मातीचा धर बसला आहे. त्यामुळे द्राक्ष पिकांना मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गटाराची नाली ठरतेय जीवघेणी
वस्तीलगत असलेले गटारबांधणीसाठी अतिक्रमण काढून तीन महिने झाले. पावसात सांडपाण्याचा त्रास नागरिकांनी सहन केला, मात्र आता त्याच सांडपाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराला आमंत्रण मिळत आहे.नालीसाठी आणलेले पाइपदेखील ठेकेदार परत घेऊन जात असल्याने नागरिकांना कडून नाराजी व्यक्त केली जात आहे .
कासव गतीच्या कामामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराने थैमान घातले आहे. शहरातून गेलेल्या रस्त्याचे काम जलद गतीने करावे, अन्यथा जनआंदोलन छेडून रस्ता रोको केला जाईल. प्रशासनाचा निषेध नोंदविला जाईल.
दत्तू झनकर, उलगुलान सेना
कोरोनामुळे रस्ताचे काम रखडले होते, आता काम सुरू झाले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाईल.
-माणिक गाडे, रस्ते इंजिनिअर, शिर्डी-सुरत मार्ग