समृद्धी मार्गाबाबत सेनेच्या दुटप्पी भूमिकेने शेतकरी अचंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:09 PM2018-11-29T23:09:14+5:302018-11-29T23:09:50+5:30
संजय पाठक। नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता ...
संजय पाठक।
नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता अचानक भूमिका बदलली असून, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे समृद्धीबाधीत शेतकºयांना धक्का बसला असून, त्याची प्रतिक्रिया निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर मुळातच शिवसेनेने त्यास विरोध करून हा वेगळ्या विदर्भाचा डाव असल्याची टीका केली होती. तर प्रत्यक्ष महामार्गासाठी बाधीत गावे जाहीर होऊन जमिनी घेण्याची कार्यवाही सुरू झाली तेव्हा शिवसेनेने स्थानिक स्तरावर त्याला कडाडून विरोध केला. खुुद्द उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये उत्तर महाराष्टÑाचा मेळावा घेतला. त्यावेळी समृद्धी बाधितांच्या बाजूने म्हणजेच शेतकºयांच्या बाजूनेच उभे राहू आणि हा रस्ता होऊच देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यातून ९७ किलोमीटर क्षेत्रातून हा रस्ता जात असून, दोन्ही तालुक्यांतील ४९ गावे बाधीत होत आहेत. या गावांमधील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली तसेच मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाºयांना डांबण्यापर्यंत आंदोलने करण्यात आली होती. शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेतली होती. परंतु आता मात्र या रस्त्याला नाव देण्याच्या स्पर्धेत शिवसेनाच उतरली असून, मार्गाला शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिंदे यांची संदिग्ध भूमिका
बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची देखील समृद्धीबाधीत शेतकºयांनी भेट घेतली होती. त्यांनी सक्तीने भूसंपादन होऊ देणार नाही असा शब्द दिला, परंतु तो पाळला नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकºयांनी कृतीशिल विरोधाची भूमिका घेतली होती तीदेखील पूर्ण झालेली नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या उत्तर महाराष्टÑाच्या मेळाव्याप्रसंगी समृद्धीसंदर्भात शेतकºयांच्या पाठीशी राहू, असे सांगितले होते; परंतु तसे घडले नाही. शिवसेनेने शब्द पाळला नाही.
- राजू देसले, भाकपा.