केळझर धरणातील पाणी मिळत नसल्याने शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 07:08 PM2020-09-07T19:08:33+5:302020-09-07T19:15:04+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.
लोकमत न्युज नेटवर्क
औंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.
येथील चारी चे गेल्या पंधरा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेले चारी नंबर ८ चे काम आज रोजी पूर्ण झालेले आहे. मात्र ज्या केळझर डाव्या कालव्यातून पाणी चारी नंबर आठ ला येणार आहे. तो डावा कालवा काही ठिकाणावर नादुरु स्त असल्यामुळे पाणी येण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभागाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. या कालव्यासाठी २०१९ यावर्षी चार कोटी ९५ लाखाचा निधी मंजूर होऊन संबंधित ठेकेदाराचे टेंडर ही झाले आहे. ठेकेदार मात्र कानाडोळा करीत आहे. त्यामुळे आज पाणी न पोहोचण्याची परिस्थिती उद्भवली आहे. संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केले असते तर आज रोजी कुठलीही अडचण आली नसती. ठेकेदाराने तात्काळ पाटाची दुरु स्ती करून पाणी कौतिक पाडे पर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी घ्यावी असे सर्व शेतकऱ्यांचे मत आहे. आणि संबंधित विभागाने हे काम पूर्ण करून घेतल्यास१८तारखेला कार्यालयास कुलूप लावण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. केळझर धरणातून वाहून जाणारे पूर पाणी शेतकºयांच्या मळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे असे मत शेतकºयांनी अधिकाºयांसमोर मांडले. निवेदनावर सुधाकर रौंदळ, राजेंद्र जाधव, नंदकिशोर शेवाळे, गोपीनाथ मोहन, भिका रौंदळ, प्रभाकर रौंदळ, तात्या रौंदळ, लखन पवार, समाधान जाधव, पुंडलिक रौंदळ, मनोज मोरकर, अरु ण मोहन, राजेंद्र जाधव, देवबा मोहन आदींच्या सह्या आहेत.
आम्ही शेतकºयांनी चारी नंबर आठ ला कधी पाणी येईल याची अपेक्षा सोडली होती, मात्र कान्हेरी नदीवरील काम पूर्ण झाले आणि आमच्या आशा पल्लवित झाल्या. आज कुठे आमच्या शिवारापर्यंत पाणी येईल अशी अपेक्षा आहे. मात्र संबंधित विभागाने कामाकडे लक्ष दिले तर सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल.
-सुधाकर रौंदळ, शेतकरी, तरसाळी.
केळझर डाव्या कालव्यावर ठिकठिकाणी रिपेरिंग चे काम केले आहे. मात्र उद्यापासून संपूर्ण कालवा साफसफाई करून कौतिक पाडे गावापर्यंत पाणी पोहोचवण्याची आम्ही हमी घेतो. उद्यापासून जास्तीत जास्त यंत्रणा उभी करून लवकरात लवकर पाणी पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
-ए.बी. रौंदळ,सहाय्यक अभियंता, सटाणा.