कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:53 PM2020-05-05T21:53:40+5:302020-05-05T23:16:27+5:30
येवला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या याद्या जाहीर झाल्याने पात्र शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीने लाभार्थी शेतकºयांच्या पदरी पुन्हा काही दिवसांची प्रतीक्षाच येऊन पडली आहे. केवळ १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९पर्यंत कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व्याजासह थकीत असलेले व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे, अशाच शेतकरी कर्ज खातेदारांसाठी ही योजना आहे.
येवला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या याद्या जाहीर झाल्याने पात्र शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीने लाभार्थी शेतकºयांच्या पदरी पुन्हा काही दिवसांची प्रतीक्षाच येऊन पडली आहे.
केवळ १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९पर्यंत कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व्याजासह थकीत असलेले व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे, अशाच शेतकरी कर्ज खातेदारांसाठी ही योजना आहे.
दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असणारे, सोनेतारण कर्ज असणारे, १ एप्रिल २०१५ पूर्वी कर्ज घेतलेले परंतु पुनर्गठण न केलेले, तसेच ३१ मार्च २०१९नंतर कर्ज घेतलेले, चालू खात्यावरील कर्जदार, मंत्री, लोकसभा - राज्यसभा सदस्य, विधानसभा - विधान परिषद सदस्य, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी ज्यांचे एकत्रित मासिक वेतन रु पये २५ हजारपेक्षा जास्त आहे, यामधील चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून महावितरण, एसटी महामंडळ, अनुदानित संस्था यांचे अधिकारी, कर्मचाºयांचे एकत्रित वेतन २५ हजारपेक्षा जास्त आहे, तसेच शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणाºया व्यक्ती, निवृत्त वेतनधारक व्यक्ती ज्यांचे निवृत्तिवेतन २५ हजारपेक्षा जास्त आहे, यामध्ये माजी सैनिक
वगळून तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, नागरी
सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे अधिकारी यांचे एकत्रित मासिक वेतन २५ हजारपेक्षा जास्त आहे व या सर्वांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक मंडळ या सर्वांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या कर्जमुक्ती योजनेबाबत ‘कही खुशी कही गम’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
त्याचबरोबर ज्यांची नावे लाभार्थी पात्रता यादीत आहेत, त्यांची नावेही अजून शंभर टक्के नक्की झालेली नाहीत. या याद्याबाबत ई-केवायसी तसेच काही लोकांच्या नावांमध्ये, काही लोकांच्या खाते क्र मांक, काही लोकांचा आधार क्रमांक व काही लोकांची कर्ज रक्कम यामध्ये त्रुटी आहेत.
त्यात दुरुस्त करण्याची सुविधा रेशन दुकानदार, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्राच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु संचारबंदी लागू असल्यामुळे ही सुविधा तूर्त तरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे थेट कर्जमुक्त होण्यासाठी लाभार्थी शेतकºयांनाही अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
-------------------------------------
ई-केवायसी सुविधा बंद
कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर हसू असले तरी मनात अजूनही शंका-कुशंका आहेच. जोपर्यंत लॉकडाउन आहे तोपर्यंत, शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत ई-केवायसी सुविधाही बंद असल्याने सध्यातरी लाभार्थी पात्र कर्ज खातेदारांना बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. खरीप हंगाम जवळ येत आहे, त्यामुळे शेतीची मशागत व बियाणांसाठी भांडवल म्हणून कर्ज भेटेल की नाही या विचारात शेतकरी आहे.