ढगाळ हवामान, धुके अन् पावसाळी वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:50 PM2019-12-25T17:50:33+5:302019-12-25T17:51:09+5:30
खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.
खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे.
चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.
तर काही उन्हाळी कांद्याचे रोपे लागवडसाठी तयार झाली आहेत. ज्या शेतकºयांनी लवकर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. ते कांद्याचे पीक जोमात आहेत. तसेच लागवडीसाठी तयार असलेले उन्हाळी कांद्याचे रोपही चागली तयार झाली आहेत.
उन्हाळी कांद्याच्या बियाण्याचे वाढलेल्या भाव व रोपाच्या तुटवड्यामुळे शेतकºयाने गव्हू व मका पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे या वर्षी मका व गव्हूच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच बरोबर काही शेतकºयांनी भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड केलेली आहे.
गव्हू व भाजीपालाची पिके जोमात आहेत. परंतु गेल्या दोन- तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे कांद्याचे पीक पिवळी पडून त्यांच्या मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.
त्यामुळे शेतकरीकांदा पिकावर महागडी अशी औषदाची फवारणी करीत आहे. या ढगाळ व धुकत वातावरणामुळे कांद्याची रोपेची अग्रभागी पिवळी पडून मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात मरू लागली आहेत.
या वर्षी गव्हू, मका व भाजीपाला पिकात वाढ झाली आहेत. परंतु या ढगाळ व धुकत वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर तंबूरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला पिकावर मावा रोगामुळे भाजीपाला पिकाची वाढ खुंटते.
चौकट....
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पाऊसामुळे कांदा, गव्हू, मका पिकावर विविध रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन कांदा पीक नामशेष होणार की काय याची भीती शेतकरी वर्गा निर्माण झाल्याने सध्या या ढगाळ व पाऊसाजन्य वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.