महामार्गावरील असुविधांबाबत शेतकरी संघटनेचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:53 PM2019-12-29T23:53:58+5:302019-12-29T23:54:21+5:30
घोटी टोल प्लाझाने आपल्या हद्दीतील महामार्गावरील विविध गावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी टोल प्लाझाच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मागण्या पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देणात आला आहे.
घोटी : घोटी टोल प्लाझाने आपल्या हद्दीतील महामार्गावरील विविध गावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी टोल प्लाझाच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मागण्या पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देणात आला आहे.
गोंदे दुमाला एमआयडीसी परिसर, पाडळी देशमुख, मुंढेगाव, माणिकखांब, खंबाळे, बोरटेंभे, पिंप्री सद्रोद्दीन फाटा येथे गतिरोधक करावेत. हायमास्ट विजेची व्यवस्था, सीसीटीव्ही बसवावे आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. रस्ता ओलांडताना शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध नागरिक यांचे अनेकवेळा अपघात होतात. हे रोखण्यासाठी आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घोटी टोल प्लाझाची आहे. टोल प्लाझाच्या विविध कामांसाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे. स्थानिकांना टोल माफ करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष गणेश गुंजाळ, शेतकरी नेते बाळकृष्ण नाठे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण मते, सचिव अंबादास जाधव, तालुकाध्यक्ष रवींद्र तारडे, तानाजी झाडे, किसन शिंदे, रेवनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.