शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कळवणला शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 PM2019-12-12T18:00:47+5:302019-12-12T18:01:33+5:30

कळवण : शेतकरी, शेतमजुर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) सकाळी कळवण बस स्थानकातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात शेतकरी संघटनेच्यावतीने निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळींसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

Farmers 'Association's unrestricted agitation to inform farmers' demands | शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कळवणला शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती आंदोलन

शेतकरी संघटनेचेच्या वतीने निर्बंधमुक्ती आंदोलन करतांना देविदास पवार कौतिक पगार धनंजय पवार अंबादास जाधव कारभारी आहेर बाळासाहेब शेवाळे आदींसह सर्वपक्षीय नेते व शेतकरी बांधव.

Next
ठळक मुद्देरास्ता रोको आंदोलन करण्यात येईल

कळवण : शेतकरी, शेतमजुर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) सकाळी कळवण बस स्थानकातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात शेतकरी संघटनेच्यावतीने निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळींसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकºयांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या स्मृतिदिन साजरा करून कोरडा दुष्काळ व ओला दुष्काळात होरपळणाºया शेतकरी, शेतमजूर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी कळवण सकाळी ११ वाजता शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार व तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळवण तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
शेतकºयांचे संपूर्ण कर्ज व वीजबिल मुक्ती करावी, कोरड्या व ओल्या दुष्काळामध्ये नुकसान झालेल्या पिकांची भरपाई म्हणून हंगामी पिकांना एकरी ३० हजार व फळबागांना एकतरी १ लाख रुपये अर्थसहाय्य मिळावे, शेतीमाल व्यापारातील सहकारी हस्तक्षेप कायमस्वरूपी बंद करून शेतकºयांना व्यापार स्वातंत्र्य द्यावे व महाराष्ट्रातील सर्व शेतमाल नियममुक्ती करावा, जगभरात तयार असणारे नवीन संशोधीत जीएम तंत्रज्ञानाची बियाणे वापरण्यास परवानगी द्यावी, एफएक्यु ची न लावता सर्व बाजार समित्यांमधून हमीभाव खरेदी करण्यात यावे, मागील वर्षात जाहीर झालेल्या दुष्काळी अनुदानाची मदत ताबडतोब शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात यावी या मागण्यासाठी निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले.
शासनाने निर्बंधमुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरीत मान्य न केल्यास रविवारी (दि.२२) शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे बाळासाहेब शेवाळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी धनंजय पवार, अशोक पवार, कौतिक पगार, अंबादास जाधव, कारभारी आहेर, शांताराम जाधव, कुबेर जाधव, राजेंद्र भामरे, निंबा पगार, विलास रौंदळ, विठोबा बोरसे, रामा पाटील, घनशाम पवार, राजेंद्र पवार, रत्नाकर गांगुर्डे, चंद्रकांत पवार, रामराव पगार, मधुकर वाघ, हरिभाऊ वाघ, कौतिक गांगुर्डे, ललित आहेर, संदिप वाघ, किशोर पवार, दिलीप शेवाळे, अनिल रौंदळ, भिला आहेर, गोरख आहेर, विजय रौंदळ, भिला पवार, नितीन पवार, नरेंद्र पवार, राजेंद्र पगार आदीसर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते .

Web Title: Farmers 'Association's unrestricted agitation to inform farmers' demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.