वडनेर महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:23 AM2018-12-03T00:23:14+5:302018-12-03T00:25:29+5:30

वडनेर : नादुरुस्त झालेल्या रोहित्राअभावी वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून रोहित्र दुरुस्त करून न मिळाल्याने मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी परिसरात वडनेर येथील महावितरण कार्यालयात संतप्त शेतकºयाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Farmer's attempt to self-reliance at the office of Vadnar Mahavitaran | वडनेर महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

वडनेर महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्दे नादुरुस्त रोहित्र : महावितरणावर टाळाटाळचा आरोप

वडनेर : नादुरुस्त झालेल्या रोहित्राअभावी वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून रोहित्र दुरुस्त करून न मिळाल्याने मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी परिसरात वडनेर येथील महावितरण कार्यालयात संतप्त शेतकºयाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या काटवन परिसरात दुष्काळी परिस्थिती असून, त्या भागात कांदा लागवड सुरू आहे. वळवाडी शिवारात मधुकर पाटील या शेतकºयाची जोडणी असलेले रोहित्र दोन-तीन दिवसांपूर्वी नादुरुस्त झाल्याने वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाºयांना याबाबत त्यांनी कळविले होते; मात्र संबंधितांनी रोहित्र दुरुस्त करण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त शेतकºयाने आज महावितरण कार्यालयात येऊन स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांकडून रोहित्र दुरुस्तीसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप सदर शेतकºयाने केला असून, तसा कोणताही संबंध नसून रोहित्र दुरुस्तीबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले होते. येत्या दोन-तीन दिवसात रोहित्र दुरुस्त करण्यात येणार होते. असे असताना सदर शेतकºयाने वडनेर महावितरण कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार वडनेर महावितरण कार्यालयाने पोलीस ठाण्यात दिली आहे.बेकायदेशीर परमीट देता येत नाही
च्संबंधित शेतकºयाच्या शेतातील रोहित्राची दुरुस्ती करण्यात येणार होती; मात्र सदर शेतकरी वीज बंद करण्याचे परमिट मागत होते. बेकायदेशीर परमिट देता येत नाही. पैसे मागणीचा महावितरणशी कोणताही संबंध नसल्याचा दावा महावितरणच्या सूत्रांनी केला आहे.

Web Title: Farmer's attempt to self-reliance at the office of Vadnar Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.