शेतकऱ्यांचे लक्ष लागले आभाळाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:11 PM2019-05-29T18:11:41+5:302019-05-29T18:12:01+5:30
खामखेडा : यंदा पावसाळा उशीरा सुरु होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आाहे. शेतीच्या कामाकरीता त्याचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. हवामान खात्याने चालु वर्षी लवकर पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाळा हा रोहिणी नक्षत्रापासून सुरवात होते. २४ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरवात झाली आहे. परंतु रोहिणी नक्षत्रात लागून तीन दिवस होत आले परंतु पावसाचे कोणतेही संकेत दिसत नाही.
खामखेडा : यंदा पावसाळा उशीरा सुरु होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आाहे. शेतीच्या कामाकरीता त्याचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे.
हवामान खात्याने चालु वर्षी लवकर पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाळा हा रोहिणी नक्षत्रापासून सुरवात होते. २४ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरवात झाली आहे. परंतु रोहिणी नक्षत्रात लागून तीन दिवस होत आले परंतु पावसाचे कोणतेही संकेत दिसत नाही.
दर वर्षी १५ मे नंतर पावसाचे वातावरण तयार होत असे. परंतु या वर्षी मे महिना संपत आला तरी पावसाचे कोणतेही चिन्हे दिसत नाही. दिवसभर भरपूर उष्णता होते. परंतु जोरदार वारा वाहत नाही. आकाशात ढग ही जमा होत नाही. त्यामुळे शेतकर्यांचे लक्ष आकाशात लागु आहे. जर जातात. शेतकरी खरीपाच्या मशागतीच्या कामे पूर्ण करीत आहे. यामुळे खरीपाच्या पेरणी आदि पूर्वमशागत म्हणजे जमिनीला बेले मारणे, वखारणी करणे, शेणखात मिळविणे आदि कामे केल्यास पिकांची पेरणी सुरळीत करता येते. परंतु रोहिणीच्या नक्षत्राने पाठ दाखिवली मृगाचा पावसात भुईमूगाच्या व इतर पिकाच्या दृष्टीने उत्तम असतो.जर मृग नक्षत्रात पावसाला सुरवात झाली तर बाजरी, भुईमुग, तुर, मका आदि पिकांची पेरणी करतात. मका या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. खामखेडा परिसरामघ्ये मकाच्या पेरणी मोठया प्रमाणात केली जाते. जर मृग नक्षत्रात सुरवातील पाऊस पाडला नाही या पिकांची पेरणीस उशीर होणार आहे. तेव्हा भुईमूग, बाजरी, तुर, मुग, मका आदि पिकाऐवजी , सोयाबीनसह अन्य पिकांची पेरणी करावी लागणार आहे. अजूनही पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने जास्त कालावधिच्या मका क्षेत्रात घट होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.
लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण असून, मागील दोन वर्षापासून दुष्काळाला सामोरे गेल्याने याही वर्षी तीच परिस्थिती उद्भवेल का? याची धास्ती शेतकºयांनी घेतली आहे. गेल्या वर्षीही रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे पेरणी उशीरा झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती.
गेल्या दोन वर्षापासूनब उशिरा येणाºया पावसामुळे पिकांची नियोजन बदल करावा लागत असल्याने पाहिजे. त्या प्रमाणात पिकाचे उत्पादन येत नाही. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने हाती उत्पन्न नआल्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन ढासळत आहे.