भूसंपादनाच्या नोटिशीने शेतकरी झाले आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 09:55 PM2020-08-13T21:55:29+5:302020-08-13T23:47:53+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइनच्या रुंदीकरण तसेच विद्युतीकरणासाठी मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांतील शेतकºयांना भूसंपादनाबाबत नोटीस आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, घरातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी व योग्य तो मोबदला मिळावा अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असे यावेळी संतप्त शेतकºयांनी सांगितले.

इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वेमार्गाच्या दुतर्र्फा असलेल्या शेतकºयांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे नुकत्याच रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या असून, येथील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
प्रस्तावित लोहमार्गाप्रश्नी तालुक्यातील मुकणे, पाडळी, कुºहेगाव, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांत शेतकऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून, त्यांनी बैठकीत आक्रमक भूमिका पार पडली.
नांदूरवैद्य व बेलगाव कुºहे या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या आधीच शासनाने केंद्रीय संरक्षण विभागाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी या आधीच संपादित केल्या असून, आता रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा जमिनी संपादित होणार असल्यामुळे येथील शेतकरी पूर्णत: भूमिहीन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
गावागावांत शेतकºयांच्या बैठकायेथील शेतकºयांशी भूमिपुत्र फाउण्डेशचे विनोद नाठे यांनीदेखील चर्चा करून कुठलाही परिस्थितीत जमिनी संपादित होऊन देणार नसल्याचे यावेळी सांगितले. याविषयीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले आहे.इगतपुरी ते मनमाड या नवीन लोहमार्गाच्या विस्तारीकरणाबाबत ग्रामपंचायतींना नोटिसा आल्या असून, या आधीच शासनाने आमच्या गावातील जमिनी महामार्ग, धरणे तसेच औद्योगिक वसाहतींसाठी संपादित केल्यामुळे आता रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्यानंतर शेतकºयांनी उदरनिर्वाह कसा करायचा ?
- खंडेराव धांडे, सरपंच,
पाडळी देशमुखआधीच शासनाने आमच्या जमिनी संपादित केल्या असून, आता उर्वरित जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी जाणार या धक्क्याने शेतकरी हादरले आहेत. रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर माहितीसाठी बैठका घेऊन जमिनी संपादनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- संगीता धोंगडे,
सरपंच, कुºहेगाव.