शेतकऱ्यांनी शिर्डी-साक्री महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 07:19 PM2020-09-15T19:19:25+5:302020-09-15T19:20:25+5:30

सटाणा:केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आक्रमक झाला असुन मंगळवारी (दि.15) शेतक?्यांनी करंजाड येथे अचानक ठिय्या देऊन एक तास शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला .या आंदोलनात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील आपण प्रथम शेतकरी असल्याचे सांगून आंदोलनात उडी घेतली .

Farmers blocked the Shirdi-Sakri highway | शेतकऱ्यांनी शिर्डी-साक्री महामार्ग रोखला

शिर्डी-साक्री महामार्गावरील करंजाड उपबाजार समिती जवळ छेडण्यात आलेल्या कांदा आंदोलनात बोलतांना आमदार दिलीप बोरसे.सहभागी कृष्णा भामरे ,प्रवीण देवरे ,जालिंदर देवरे ,गोकुळ अहिरे आदी .

Next
ठळक मुद्देबागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील आंदोलनात उडी घेतली .

सटाणा:केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आक्रमक झाला असुन मंगळवारी (दि.15) शेतक?्यांनी करंजाड येथे अचानक ठिय्या देऊन एक तास शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला .या आंदोलनात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील आपण प्रथम शेतकरी असल्याचे सांगून आंदोलनात उडी घेतली .शासनाने सोमवारी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने बाजार समित्यांच्या लिलावाच्या दुपारच्या सत्रात कांदा अक्षरश: हजाराने आपटला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली .त्याचे पडसाद मंगळवारी बागलाणमध्ये उमटले .आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शिर्डी-साक्री महामार्गावरील करंजाड येथील उपबाजार समिती समोर संतप्त शेतकºयांनीकांद्याने भरलेली ट्रक्टर अडवले लावून ठिय्या दिला.यावेळी बागलाणचे बोरसे यांनी शेतक?्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली .बोरसे म्हणाले की ,मी प्रथम शेतकरी आहे .शेतक?्यांच्या व्यथा मी अनुभवतो आहे.आणि त्याची मला जाणीव असल्यामुळेच मी आंदोलनात उतरो आहे .शेतक?्यांनी कांद्याला दोन पैसे मिळतील म्हणून सर्व धोके पत्करून चाळीत कांदा साठवला आहे .आजच्या घडीला ढगाळ वातावरणामुळे तो देखील खराब होऊन शेतक?्यांचे नुकसान होत आहे .तर दुसरीकडे अचानक निर्यातबंदी केली .त्यामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे .मी स्वत: शेतकरी असल्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे कांदा उत्पादकांच्या भावना कळवण्यासोबत बाजू मांडण्याचा प्रयत्न करू आणि ते नक्कीच आपल्याला न्याय देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला .यावेळी आंदोलनकर्त्या शेतक?्यांनी आमदार बोरसे यांना निर्यातबंदी तत्काळ उठवावी या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले .आंदोलनात भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भामरे ,जितेंद्र देवरे ,संजय निकम ,योगेश देवरे ,प्रवीण देवरे ,गोकुळ अहिरे ,अरुण देवरे ,हेमराज देवरे ,सतीश देवरे ,जालिंदर देवरे ,साहेबराव देवरे आदी सहभागी झाले होते .

मालेगाव रस्ता रोखला .....
सटाणा बाजार समितीच्या प्रवेशद्वार जवळ सकाळी अकरा वाजता अचानक संतप्त शेतक?्यांनी मालेगाव रस्त्यावर ठिय्या देऊन वाहतूक अडवली .यावेळी निर्यातबंदी तत्काळ मागे घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.यावेळी ष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूयर्वंशी यांनी मोदी सरकारवर टीका केली .पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात बाजार समितीचे संचालक केशव मांडवडे ,पांडुरंग सोनवणे आदी शेतकरी सहभागी झाले होते .

 

Web Title: Farmers blocked the Shirdi-Sakri highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.