शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधला बंधारा, चार गावांचा दुष्काळ हटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 02:55 PM2018-09-06T14:55:07+5:302018-09-06T14:56:38+5:30

 Farmers built bunds, four dams, and four villages | शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधला बंधारा, चार गावांचा दुष्काळ हटला

शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधला बंधारा, चार गावांचा दुष्काळ हटला

Next

नितीन बोरसे*सटाणा : यंदा राज्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचे सावट असतानाच त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांनी हेवेदावे आणि गावगाड्याचे राजकारण बाजूला सारून अवघ्या एका महिन्यात लोकसहभागातून ९ ते १० दशलक्ष घनफूट क्षमतेचा बंधारा बांधून कान्हेरी नदीचे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि शासनाचा कोणताही निधी खर्च न करता ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे अकरा लाख रु पये खर्च करून मातीचा बंधारा बांधून बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील शेतकºयांनी एक नवा आदर्शही निर्माण केला आहे. बागलाण तालुक्यात यंदा आॅगष्ट महिन्यात पश्चिम भागातील जलाशय पाण्याने भरली असली तरी पावसाने तब्बल एक मिहन्यापासून दडी मारल्यामुळे मध्य ,पूर्व , उत्तर ,दक्षिण बागलाण मधील पिके पाण्याअभावी करपू लागल्याने दुष्काळाचे संकट अधिक गिहरे होत चालले आहे.सलग चार ते पाच वर्षांपासून कमी पावसामुळे बहुतांश भागातील बागायती शेती उजाड होत चालली आहे.बागलाण तालुक्यातील कान्हेरी नदी परिसरातील केरसाणे परिसरही याला अपवाद नाही.सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला.त्यातच गावातील राजकीय हेवेदावे गावाच्या प्रगतीला अडथळे निर्माण होऊ लागले.त्यामुळे आधी गावातील एकमेका बद्दल गढूळ झालेली मन जुळविण्याबरोबरच एकमेकातील द्वेष भावना दूर करणे आवश्यक असल्याने त्यासाठी गावातील इंदरिसंग थोरात ,सिव्हील इंजिनियर दिलीप काका मोरे यांनी पुढाकार घेतला.गावातील जुन्या जाणत्या प्रमुख गावकºयांच्या बैठका घेऊन गावाच्या एकजुटीचे महत्व पटवून दिले.या एकजूटीतूनच लोकसहभागची चळवळ रु जवण्याचा प्रयत्न केला आण ित्याला यश देखील आले.
----------------------
कमी पावसामुळे उजाड झालेली बागायती शेती फुलवून गतवैभव प्राप्त करण्यासाठी थोरात आणि मोरे या जोडगोळीने बाळासाहेब मोरे ,बाळसाहेब अहिरे ,भरत अहिरे ,संजय अहिरे ,देविदास मोरे ,मुरलीधर मोरे ,प्रशांत मोरे ,उत्तम अहिरे ,विष्णू अहिरे यांना एकत्र आणले.सततचा दुष्काळ हटविण्यासाठी गाव नजीकच कान्हेरी नदीवर बंधारा बांधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची सुपीक कल्पना पुढे आली. शेतकर्यांनी अकरा लाख रु पयांची आर्थिक मदत गोळा करून सुरवातील गावक-यांच्या सहभागातून चा-यांचे खोदकाम करून मातीबांधचे काम सुरु केले.त्यानंतर नदीचे एक किलोमीटर पर्यंत नदीचे खोलीकरणच्या कामास सुरु वात केली.या हे काम सलग महिनाभर चालले.हा मातीचा बंधारा पावसाच्या पाण्याने पूर्ण भरून वाहू लागला आहे.यामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title:  Farmers built bunds, four dams, and four villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक