शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरी-व्यवसायात करीअर करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 17:40 IST2019-02-28T17:40:03+5:302019-02-28T17:40:27+5:30
सिन्नर : जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा प्रतिकूल अवस्थेतून जात असून, कमी शिक्षणामुळे त्याच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय होत आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरी-व्यवसायात करीअर करावे
सिन्नर : जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा प्रतिकूल अवस्थेतून जात असून, कमी शिक्षणामुळे त्याच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय होत आहे. शेती आहे, तर नोकरी नाही अशी असल्याने वयात आलेल्या मुलांचे विवाह जुळणेही कठीण होवून बसले आहे. त्यामुळे कष्टकरी बापाच्या घामाची जाण ठेवून शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेत नोकरी किंवा व्यवसायात उत्तम करिअर करावे, असा सल्ला छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी दिला.
तालुक्यातल शहा येथील एस. डी. जाधव इंग्लिश मीडिअम स्कूलच्या प्रांगणात पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपिठावर जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे, पंचायत समितीचे भाजप गटनेते विजय गडाख, सदस्य योगिता कांदळकर, रवींद्र पगार, बाबा कांदळकर, संस्थेचे संस्थापक संभाजी जाधव, अध्यक्ष सोपान जाधव, सरपंच शुभांगी जाधव, संदीप कांडेकर, डॉ. एन. डी. जाधव, प्राचार्य संजय जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.