कृषीपंपाची वीज तोडल्याने शेतकरी टाॅवरवर चढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 01:42 AM2022-01-31T01:42:36+5:302022-01-31T01:44:45+5:30

कोणतीही पूर्वसूचना न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महापारेषणच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. सुमारे सहा तास शेतकरी टॉवरवरच बसून होते, अखेर वीज वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्यानंतर शेतकरी टॉवरवरून खाली उतरले. नाशिक तालुक्यातील सिद्धपिंप्री गावातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा महावितरणने अचानक खंडित केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. गेल्या दोन दिवसांपासून विनवणी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर रविवारी (दि.३०) सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांनी विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले.

Farmers climbed the tower due to power outage | कृषीपंपाची वीज तोडल्याने शेतकरी टाॅवरवर चढले

कृषीपंपाची वीज तोडल्याने शेतकरी टाॅवरवर चढले

Next

नाशिक: कोणतीही पूर्वसूचना न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महापारेषणच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. सुमारे सहा तास शेतकरी टॉवरवरच बसून होते, अखेर वीज वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्यानंतर शेतकरी टॉवरवरून खाली उतरले. नाशिक तालुक्यातील सिद्धपिंप्री गावातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा महावितरणने अचानक खंडित केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. गेल्या दोन दिवसांपासून विनवणी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अखेररविवारी (दि.३०) सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांनी विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले.

याबाबतची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखविली. मात्र, जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत हाेत नाही तेापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, माजी आमदार योगेश घोलप हेही घटनास्थळी पोहोचले. खासदार गोडसे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत चांगलाच जाब विचारला. आमदार फरांदे यांनी देखील नोटीस न देता वीज तोडण्याची कारवाई चुकीची असल्याचे सांगत वीज जोडण्याची मागणी केली. परंतु महावितरण मध्यवर्ती कार्यालयाचे आदेश असल्यामुळे स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय घेण्यास अभियंते असमर्थता दर्शवित असल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले.

सुमारे सहा तासांपेक्षा अधिक काळ आंदोलन सुरू असल्याने सायंकाळ होत असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना आदेश आले आणि त्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याची तयारी दर्शविली. प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता आंदोलनाची सांगता झाली.

Web Title: Farmers climbed the tower due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.