सोमठाणेत साकारणार शेतकरी ते ग्राहक बाजारतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:46+5:302021-04-08T04:14:46+5:30

सिन्नर : शेतकरी ते थेट ग्राहक सेवा बाजारतळ ही पुणे, मुंबईसारख्या शहरांत राबविली जाणारी संकल्पना नाशिक जिल्ह्यात प्रथमच ...

Farmers to consumer market to be set up in Somthana | सोमठाणेत साकारणार शेतकरी ते ग्राहक बाजारतळ

सोमठाणेत साकारणार शेतकरी ते ग्राहक बाजारतळ

Next

सिन्नर : शेतकरी ते थेट ग्राहक सेवा बाजारतळ ही पुणे, मुंबईसारख्या शहरांत राबविली जाणारी संकल्पना नाशिक जिल्ह्यात प्रथमच सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गावात राबविली जाणार आहे. या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुमारे तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा प्रकल्प दोन एकरांत उभा राहत असून त्याद्वारे शेतकरी व ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे.

आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना व तो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहक आता शहरांतील बाजारांत अथवा मॉलमध्ये भाजीपाला अथवा अन्य वस्तू खरेदी करण्यास जातो. परिणामी, स्थानिक शेतकऱ्यांना आपला भाजीपाला पुरेशा ग्राहकवर्गाअभावी व्यापाऱ्याला मातीमोल किमतीत विकावा लागतो. अशा प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून, आ.माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या सोमठाणे या स्वतःच्या गावी शेतकरी ते थेट ग्राहक सेवा बाजारतळ उभारणी करण्याचे ठरवले. मात्र, सध्या आठवडे बाजारतळांसाठी पणन विभागाकडून जो निधी मिळतो, त्यात हे काम होणार नाही, ही बाब हेरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाकडून या कामास निधी देण्याची मागणी केली. त्यानुसार नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समिती यांना हे काम मंजूर करण्याचे आदेश केले. या कामाचा प्रस्ताव नावीन्यपूर्ण योजनेत दाखल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये निधीही मंजूर केला आहे.

-----------

शेतकरी, ग्राहकांचा फायदा

शेतकरी व ग्रामीण महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होईल. सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. ग्राहक अदा करीत असलेली रक्कम थेट शेतकऱ्यांस मिळेल. आठवडे बाजाराची वेळ व ठिकाण निश्चित असल्याने शेतीमाल काढणीचे आणि विक्रीचे नियोजन शेतकऱ्यांना करता येईल. शंभर टक्के रोखीने व्यवहार या ठिकाणी होणार असून कोणत्याही प्रकारच्या परवान्यांची आवश्यकता नाही. एकाच छताखाली भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, दूध, डाळी, प्रक्रिया उत्पादने, ग्रामीण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील.

------------------------

दोन एकर जागेत उभारणी

निफाड, कोपरगाव तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या सोमठाणेत दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. या ठिकाणी कोकाटे यांच्यामार्फत मूलभूत सुविधा देण्याची कामे झाली आहेत. आता संपूर्ण बाजारतळ बंदिस्त राहणार असून त्यामुळे कोणत्याही ऋतूंचा यावर परिणाम होणार नाही. परिसर हा पूर्णतः बागायती असून त्यामुळे शेतकरी दररोज ताजा भाजीपाला या ठिकाणी विक्रीसाठी आणू शकणार आहेत. सिन्नर तालुक्याप्रमाणेच निफाड, कोपरगाव तालुक्यांतील शेतकरी व ग्राहक या ठिकाणी खरेदी- विक्री करू शकणार आहेत.

(०७ सिन्नर २)

===Photopath===

070421\07nsk_26_07042021_13.jpg

===Caption===

०७ सिन्नर २

Web Title: Farmers to consumer market to be set up in Somthana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.