कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 09:06 PM2020-07-25T21:06:56+5:302020-07-26T00:21:54+5:30

कळवण : जिवाचे रान करून पिकवलेला कांदा कवडीमोल दरात विकला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.

Farmers in crisis as onions are not guaranteed | कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकरी संकटात

कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकरी संकटात

googlenewsNext

कळवण : जिवाचे रान करून पिकवलेला कांदा कवडीमोल दरात विकला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना पावसाने पाठ फिरवली, पावसाअभावी पिके करपू लागली असून, शासन स्तरावरून पंचनामे करण्याची मागणी होत आहे. कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ही पिके संकटात आली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठ ते दहा दिवसात पाऊस पडला नाही शेती व्यवसाय धोक्यात येणार असून, बळीराजाला पुन्हा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
शेतकऱ्याला या संकटातून वाचवण्यासाठी शासनस्तरावरून उपाययोजना करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शरद पवार नाशिकच्या दौºयावर आले असता पवार यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Web Title: Farmers in crisis as onions are not guaranteed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक