कांदा अनुदानाचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:43 PM2019-02-13T17:43:48+5:302019-02-13T17:44:01+5:30
लासलगाव : येथील बाजार समितीत जानेवारी महिन्यात विक्र ी झालेल्या कांद्याच्या पावत्या स्वीकारल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आवारात शेतकºयांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहे.
लासलगाव : येथील बाजार समितीत जानेवारी महिन्यात विक्र ी झालेल्या कांद्याच्या पावत्या स्वीकारल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आवारात शेतकºयांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहे.
राज्य शासनाने नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयांना २०० रु पये अनुदान जाहीर केले असून सहकारमंत्र्यांनी जानेवारी महिन्याच्या अनुदानाची घोषणा केली असली तरी अजून बाजार समित्यांना अधिकृत माहिती नसल्याने शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था आहे. गेल्या पाच महिन्यापासून शेतकरी कांद्याला भाव चांगल्या प्रमाणात मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून राज्य शासनाने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात विक्र ी झालेल्या कांद्याला २०० रु पये प्रतिक्विंटल प्रमाणे अनुदान जाहीर केलेले आहे. त्यामुळे या दोन महिन्यात विक्र ी झालेल्या कांद्याचे अर्ज भरण्यासाठी बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात विक्र ी झालेल्या कांदा
विक्र ीच्या पावत्या स्वीकारल्या जात नाहीत अशी शेतकºयांची तक्र ार असली तरी लासलगाव बाजार समितीत जानेवारी महिन्यातील कांदा विक्र ीचे पावती व अर्ज स्वीकारले जात आहे. यामुळे बाजार समितीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.