येवल्यात कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 08:43 PM2020-04-12T20:43:30+5:302020-04-13T01:04:40+5:30

येवला : सलग तीन दिवस सुटी असल्याने शनिवारी होणाºया लिलावासाठी येवला बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली होती. शनिवारी, ८११ ट्रॅक्टरमधून आलेल्या सुमारे २० हजार क्विंटल कांद्याचा लिलाव करण्यात आला.

 Farmers crowd for sale onion in coming | येवल्यात कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

येवल्यात कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

googlenewsNext

येवला : सलग तीन दिवस सुटी असल्याने शनिवारी होणाºया लिलावासाठी येवला बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली होती. शनिवारी, ८११ ट्रॅक्टरमधून आलेल्या सुमारे २० हजार क्विंटल कांद्याचा लिलाव करण्यात आला. लाल कांद्यास किमान २००
्नरुपये, कमाल ४७० रुपये, तर सरासरी ५५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याला किमान ३०० रु पये, कमाल १ हजार ५०, तर सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीने मुक्कामी कुणी येऊ नये, अशी सूचना केलेली असतानाही कांदा उत्पादक शेतकºयांनी रविवारपासून मंगळवारपर्यंत सलग तीन दिवस बाजार समितीला सुटी असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच ट्रॅक्टर आणून गर्दी केली होती. यामुळे नगर-मनमाड राज्य महामार्गावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी बाजार समिती प्रशासनाला सूचना केल्यानंतर प्रशासनाने शुक्र वारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत ५०० ट्रॅक्टर टोकन देऊन आत घेतले. यानंतरही ट्रॅक्टर येतच राहिल्याने शनिवारी दुपारपर्यंत महामार्गावर पुन्हा गर्दी झाली. यानंतर संतोषी माता मंदिरालगतच्या प्रांगणात कांद्याचे ट्रॅक्टर उभे करण्यात आले.

Web Title:  Farmers crowd for sale onion in coming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक