दरसवाडी येथील शेतकऱ्यांने तोडला द्राक्षबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:52 PM2018-10-29T17:52:50+5:302018-10-29T17:53:05+5:30
चांदवड (महेश गुजराथी)- तालुक्यातील दरसवाडी येथील शेतकरी समाधान शिंदे या तरुण शेतकºयांने दुष्काळी परिस्थिती , पिण्यासाठी पाणी नाही, पाटाला पाणी नाही, कर्जमाफी झाली नाही यामुळे आपला सहा बिगे द्राक्ष बाग दुष्काळास कंटाळून कुºहाडीने तोडून टाकला.

.मध्यंतरी हे सर्व कर्ज माफ झाल्याची वार्ता समजताच या शेतकºयांने बॅकेकडे धाव घेतली असता पुर्वीचे कर्ज भरा व मगच तुम्हाला नवीन पिक कर्ज मिळेल असे बॅकेने बजावले. सरकारने फक्त घोषणा केली. दीड लाख रुपये सुध्दा कर्ज माफी झाली नाही अशी माहिती या शेतकºयांने बाग तोडतांना दिली. आतापर्यंत टॅँकरने विकतपाणी आणून बाग कसाबसा वाचविला. आतापर्यंत या द्राक्ष बागेसाठी सुमारे तीन लाख रुपयांचे औषधे उधार आणले या औषधाचे पैसेही अद्यापपर्यंत दुकानदाराचे दिले नाही .तर या शेतकºयांचे वय सुमारे २४ वर्षे आहे. त्याच्या जन्मापासून व वडीलांनीही बºयाच वर्षात दरसवाडी पोच कालव्यास पाणी आले नसल्याचे सांगीतले.तर आता फक्त विषारी औषध सेवन करुन जीवनयात्रा संपवावी का ? असा प्रश्न या शेतकºयांला पडला आहे. तर पिण्यासाठी गेल्या महिन्यापासून पाणी नाही. सहा बिगे कांदे केले तेही पाण्याअभावी जळून गेले. आता बाजार ,धान्य , किराणाची पंचाईत झाली असून दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न या शेतकºयांला पडला असून त्याने संताप करुन अक्षरक्ष: बाग तोडून टाकल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.