दुधाला अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:55 PM2020-07-22T21:55:55+5:302020-07-23T00:57:29+5:30
येवला : नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना पीककर्ज द्या, खतांचा साठा करून काळाबाजार करणाºयांवर कारवाई करा, दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्या, दूध धंद्याला कमी व्याजदराने शासनाने कर्ज द्यावे आदी मागण्यांचे निवेदन येवला तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले.

शेतकºयांना तात्काळ खते उपलब्ध करून द्या, कोरोना प्रादुर्भावामुळे दूध धंदा अडचणीत आला असून, शासनाने शेतकºयांना प्रतिलिटर दहा रु पये अनुदान द्यावे व दूध धंदासाठी शेतकºयांना शासनाने कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भाजप तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, बाबा डमाळे, आनंद शिंदे, प्रा. नानासाहेब लहरे, गोरख खैरनार, बाळासाहेब कुरे, संतोष केंद्रे, संतोष काटे, बाळासाहेब होळकर, केदारनाथ वेळांजकर, विनोद बोराडे, मच्छिंद्र हाडोळे, युवराज पाटोळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.