देवळा तालुक्यात तणांमुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:07+5:302021-06-02T04:12:07+5:30
देवळा : शेतकऱ्यांची खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु दरवर्षी शेतात खरीप व रब्बी हंगामातील विविध प्रकारची ...
देवळा : शेतकऱ्यांची खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु दरवर्षी शेतात खरीप व रब्बी हंगामातील विविध प्रकारची पिके घेताना शेतकऱ्यांपुढे शेतात निर्माण होणाऱ्या तणांची मोठी समस्या निर्माण होत असून पिकांचा नाश करणाऱ्या जा तणांचा बंदोबस्त कसा करावा? अशी विवंचना शेतकऱ्यांना दरवर्षी पडू लागली आहे. शेती तोट्यात जाण्याचे जी काही विविध कारणे आहेत त्यात शेतात उगवणारे विविध प्रकारची तण हे एक प्रमुख कारण आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना शेतातील तण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होते. याबरोबरच काही शेतकरी मजुरीत बचत करण्याच्या उद्देशाने तणनाशकांची फवारणी करतात, परंतु यामुळे पिकांचेही थोड्या प्रमाणात नुकसान होऊन त्याचा उत्पादनावर देखील परिणाम होतो, तसेच सतत तणनाशकांची फवारणी केल्यामुळे जमिनीचा पोत खालावतो. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा वापर केला जात असे. शेतीची सर्व कामे बैलांच्या साह्याने केली जात, ही मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी जास्त कालावधी लागत असल्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत असे. त्या काळात शेतात तणांचे प्रमाण खूप कमी असे.
--------------------------
यांत्रिक शेतीस प्राधान्य
शेतीची कामे वेगाने व्हावीत यासाठी यांत्रिक शेती सुरू झाली. सर्वत्र ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची मशागतीची कामे केली जाऊ लागली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व परिश्रम वाचू लागले, परंतु पिके घेण्यामधील काळात जमिनीला विश्रांती मिळणे कमी झाले. त्याचे दुष्परिणाम शेतात होणाऱ्या तणांच्या रूपात दिसू लागले आहे. पिकांमध्ये बिचवा, गाजर गवत, दुधाळी, हरळी आदी विविध प्रकारच्या तणांचे होणारे आक्रमण शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. विविध तणासाठी वेगळे तणनाशक फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
----------------------
बळीराजा त्रस्त
पूर्वी शेताच्या बाजूने मोठे व रुंद बांध असत. या बांधावर सर्व प्रकारचे गवत, तण उगवत असे. शेतकऱ्याकडे असलेल्या पशुधनाला या चाऱ्याचा पुरवठा एक हंगामभर होत असे व उन्हाळ्यात चारा टंचाई निर्माण होत नसे. नंतर शेतकऱ्यांनी हे बांध कोरण्यास सुरुवात करत ते पूर्णपणे नष्ट केले. यामुळे जा बांधावर उगवणाऱ्या गवताने बांधावर जागा नसल्यामुळे आता शेतात अतिक्रमण तर केले नाही ना? असे म्हणण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.
(०१ देवळा १)
===Photopath===
010621\01nsk_13_01062021_13.jpg
===Caption===
०१ देवळा १